शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर होणार कारवाई, पोलीस आयुक्तांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 02:03 IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. लाइफस्टाइल म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत.

नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. लाइफस्टाइल म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाईचे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, ही बंदी केवळ कागदावरच असल्याने शहरात प्रत्येक ठिकाणी उघड्यावर धूम्रपान होताना पाहायला मिळत आहे. तर सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ यांची विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई होणे अपेक्षित असतानाही ती होत नाही. मात्र, यापुढे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे व विक्री करणारे यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. मात्र, आजवर अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत टपºयांना प्रशासनाचेच अभय लाभत आलेले असल्याने, आयुक्तांच्या इशाºयाची तीव्रता येणारा काळच दाखवून देणार आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तंबाखूमुक्त महाराष्टÑ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने कोटपा कायद्याबाबत पोलिसांना पुरेशी माहिती देऊन कारवाईचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर झाले. मंगळवारी झालेल्या या शिबिरास पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांना संबंध हेल्थ फाउंडेशन संस्थेचे डॉ. दीपक छिब्बा, देविदास शिंदे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पवार, श्रीकांत जाधव यांनी कोटपा कायद्यावर मार्गदर्शन केले. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह सहआयुक्त प्रशांत बुरडे, उपायुक्त तुषार दोशी यांच्यासह अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, उपनिरीक्षक राणी काळे, अजित गोळे उपस्थित होते.- कोटपा कायद्यात पाच प्रमुख कलमे आहेत.- कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे.- कलम- ७ नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थविक्र ीवर प्रतिबंध आहे.- कलम-६ ‘ब’नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थविक्र ीवर प्रतिबंध आहेत.- या कायद्यानुसार २०० रु पये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा २०१५नुसार एक लाख रु पये दंड आणि सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

टॅग्स :Smokingधूम्रपान