शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत ५२६ कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:21 IST

नवी मुंबईत होणार अद्ययावत तरण तलाव : नेरूळमध्ये सायन्स पार्कही उभारण्यात येणार

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल ५२६ कोटींंचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. यामध्ये वाशीमध्ये बसडेपो, तरण तलाव उभारण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. वंडर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सायन्स पार्क उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेपासून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावांचाही समावेश आहे.

शहरात विकासकामे वेगाने होत नसल्याबद्दल डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त रामास्वामी एन. यांनी शहरात सुरू असलेल्या कामांची यादीच सभागृहात सादर केली होती. जानेवारी महिन्याच्या सभेमध्ये तब्बल ५२६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. वाशी सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १९६ व १९६ ए या ठिकाणी बसस्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व आॅलिंपिक आकाराचा जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मधील वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. कॅमेरे बसविण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

प्रकल्पग्रस्त मुलांना वैद्यकीय व इतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. पालिका कार्यक्षेत्रात रात्र कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणार आहेत. बेलापूरमधील गौरव म्हात्रे केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही तयार केला आहे.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विमा कवचमहापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा २०१९ - २० ते २०२४ - २५ या वर्षासाठी अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ३ लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास २ लाख व अपघातामधील वैद्यकीय खर्चासाठी ८० हजारपर्यंत विमा लाभ प्रस्तावित केला आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका