शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या सिद्धतेसाठी पुराव्यांचे जतन गरजेचे

By admin | Updated: May 25, 2017 00:16 IST

आधुनिक काळात सायबर क्राइम व तत्सम गुन्ह्यांच्या शाबितीकरणाकरिता आवश्यक पुराव्यांचे न्यायसहायक वैधानिक पडताळणीअंती सुयोग्य जतन करणे आवश्यक आहे

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आधुनिक काळात सायबर क्राइम व तत्सम गुन्ह्यांच्या शाबितीकरणाकरिता आवश्यक पुराव्यांचे न्यायसहायक वैधानिक पडताळणीअंती सुयोग्य जतन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रायगड जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, तसेच मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (मोका) किशोर पेटकर यांनी केले आहे. मंगळवारी संध्याकाळी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित १५ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ््यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना न्या. पेटकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात व्यावसायिक निपुणता उंचावण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी, तसेच कौशल्यवृद्धीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसांच्या १५व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन येथील रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलेल्या या मेळाव्यात, कोकण पोलीस परिक्षेत्रातील रायगड, ठाणे ग्रामीण, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण १० अधिकारी व ५७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. तपासिक अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्ण पद्धतीने करता यावा, याकरिता या मेळाव्यामध्ये न्यायसहायक वैधानिक पडताळणी, फोटोग्राफी, डॉगस्कॉड, घातपातविरोधी तपासणी, सायबर सेल, सीसीटीएनएस अशा एकूण सहा विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.मंगळवारी संध्याकाळी झालेल्या समारोप समारंभात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस संघाला सांघिक विजेते पदाचा मान मिळाला. या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक हे पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी कोकण परिक्षेत्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मेळाव्यातील, ‘न्यायसहायक वैधानिक पडताळणी’ या विषयाच्या स्पर्धेचे परीक्षक रासायनिक विश्लेषक व फिंगर प्रिंटतज्ज्ञ म्हणून सुरेश शिंदे व एस. एन. ठाकूर यांनी परीक्षण केले. या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, सहा. पो. निरीक्षक गीताराम शेवाळे, सहा. पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, सहा. पो. निरीक्षक सागर कावळे आदी उपस्थित होते.