शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त आज सिडकोवर धडकणार

By admin | Updated: June 9, 2015 01:25 IST

अस्तित्वाच्या लढाईसाठी नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रकल्पग्रस्त मंगळवारी सिडकोवर धडक देणार आहेत.

नवी मुंबई : अस्तित्वाच्या लढाईसाठी नवी मुंबई, पनवेल व उरणमधील प्रकल्पग्रस्त मंगळवारी सिडकोवर धडक देणार आहेत. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली जाणार आहे. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये सिडको व शासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने २० हजार घरे नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु दुसरीकडे मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रकल्पग्रस्त कृती समितीने सिडकोला जाब विचारण्यासाठी ९ जूनला धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी नवी मुंबईमधील २८ गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच सर्वपक्षीय राजकीय नेते प्रकल्पग्रस्तांच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. आतापर्यंत आंदोलनामध्ये तरुणांचा सहभाग कमी असायचा. परंतु यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. प्रकल्पग्रस्त असलेले डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक व उच्च पदावर असलेल्या सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी ११ वाजता किल्ले गावठाणजवळील क्रोमा शोरूमपासून आंदोलनास सुरूवात होणार आहे. सिडकोभवनसमोर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या धडक मोर्चात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा विश्वास प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्त वाढवलाप्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे पोलीसही मोर्चासाठी कडक बंदोबस्त ठेवणार आहे. मोर्चाच्या मार्गावर व सिडको परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.आंदोलकांनीही मोर्चा पूर्णपणे शांततेमध्ये काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून सर्वांना शांततेत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.