शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भावी पिढी निर्व्यसनी, राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती

By admin | Updated: March 14, 2016 01:56 IST

देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.

नवी मुंबई : देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. भावी पिढी निर्व्यसनी व राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ऐरोली सेक्टर १० येथील डी.ए.व्ही. दिवा कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्संग सोहळ्यात त्यांनी भाविकांना मौलिक मार्गदर्शन केले. दिवसातील १४ तास घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचे काम स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातून केले जात आहे. आदर्श पिढी घडविण्याचे काम स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. श्री समर्थ सेवा मार्गाची संपूर्ण भारतात १५ हजारांहून अधिक सेवा केंद्रे असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यात प्रश्नोत्तरे, श्री दुर्गा सप्तशती पाठ, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, विवाह संस्कार, मराठी संस्कृती अस्मिता व हस्तशास्त्र या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. महासत्संग सोहळ्यानिमित्त खारीगाव, विटावा, कळवा, पनवेल तसेच संपूर्ण नवी मुंबई परिसरात स्वामी समर्थ रथाची भ्रमंती करण्यात आली. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी चैत्र पाडव्यापासून ते होळीपर्यंत सर्व सणांची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये भारतीय संस्कृतीनुसार सण कसे साजरे करावे, याचीही सखोल माहिती देण्यात आली. विश्वकल्याण उन्नतीसाठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून देशभरात विविध उपक्र म राबविले जात आहेत. माजी मंत्री गणेश नाईक, खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक राजेश मढवी, नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.