शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हातपाटी वाळू व्यावसायिकांचा मोर्चा

By admin | Updated: March 9, 2016 03:20 IST

समुद्राच्या चारही दिशांच्या खाड्यांच्या विळख्यातील पेणचं दादर गाव १९८९ च्या पुरात उद्ध्वस्त झालं. गेली २६ वर्षे या गावातील २,५०० एकर भातशेती खाऱ्या पाण्याने बुडून नापीक झाल्यामुळे ग्रामस्थ

पेण : समुद्राच्या चारही दिशांच्या खाड्यांच्या विळख्यातील पेणचं दादर गाव १९८९ च्या पुरात उद्ध्वस्त झालं. गेली २६ वर्षे या गावातील २,५०० एकर भातशेती खाऱ्या पाण्याने बुडून नापीक झाल्यामुळे ग्रामस्थ समुद्रखाड्यात डुबकी मारून वाळूउपसा करण्याचा परंपरागत व्यवसाय करतात. मात्र मागच्या १५ दिवसांपूर्वी येथील काळभैरव हातपाटी वाळूउपसा करणाऱ्या संघटनेची २०० ब्रास वाळू पेण तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केल्याच्या निषेर्धात मंगळवारी जागतिक महिला दिनीच दादरच्या महिला व ग्रामस्थ मंडळींनी पेण शहरात मोर्चाद्वारे भीख मांगो आंदोलन छेडीत पेण तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व शेकाप आ. धैर्यशील पाटील यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभागी होत दादर ग्रामस्थांना भक्कम पाठिंबा दिला.२०१२ मध्ये या हातपाटी वाळू व्यावसायिकांना पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी विधिमंडळात या प्रश्नावर आवाज उठवून शासन दरबारी मशिन मिळवून दिले. पारंपरिक व्यवसाय व उत्पन्नाचे दुसरे साधन नसताना रॉयल्टी भरून हे लोक व्यवसाय करीत होते. मात्र रॉयल्टी संपल्यानंतर अधिकृत परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला, मात्र ती प्रक्रिया संबंधित कार्यालयाकडून घेताना विलंब लागतो. अशा वेळेस पेण महसूल प्रशासनाने धाड टाकून दादर खाडी बंदरावरील २०० ब्रास वाळू जप्त केली होती. दुसऱ्या बाजूने सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा करणाऱ्यांवर दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे कारवाई न करता सक्शन पंपधारक रेती व्यावसायिकांना अभय दिले. ज्या वेळेस सक्शन पंप ताब्यात घेण्याची प्रांत अधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले असताना महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, दादर सागरी पोलीस यंत्रणा दादर खाडीत गेली असता, या सक्शन पंपधारकांनी या शासकीय यंत्रणेवर व हातपाटी व्यावसायिकांवर दगडफेक केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कारवाई का केली नाही, असा मोर्चेकऱ्यांचा प्रश्न होता. मोर्चेकऱ्यांना भेटावयास आलेल्या पेण तहसीलदार वंदना मकू यांना आ. धैर्यशील पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. (वार्ताहर)