शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांनी गाजली आमसभा

By admin | Updated: August 12, 2016 02:25 IST

पंचायत समितीची आमसभा गुरु वारी कॅप्टन विक्र मराव मोरे सभागृहात घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध खात्यांवरील रोष व्यक्त केला.

पोलादपूर : पंचायत समितीची आमसभा गुरु वारी कॅप्टन विक्र मराव मोरे सभागृहात घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध खात्यांवरील रोष व्यक्त केला. महावितरणकडून होणारा खंडित वीज पुरवठा, वाढीव रकमेची व उशिरा येणारी देयके, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, ग्राहकांना मिळणारी वागणूक, धोकादायक पोल बदलले नसल्याने दुर्घटनेची शक्यता व्यक्त करत कामात सुधारणा करण्याची मागणी केली.पंचायत समिती आयोजित आमसभेमध्ये पंचायत समिती व अन्य सरकारी कार्यालयाच्या विकास कामाचा आढावा घेण्यात येतो. आमसभा ही वर्षातून एकदाच घेण्यात येत असते या सभेमध्ये नागरिकांना आपले प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्याचा व त्याचे उत्तर मिळवण्याचे आणि प्रश्न सोडवण्याची संधी या सभेच्या माध्यमातून मिळते म्हणून नागरिक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी तर तालुक्याची जीवनवाहिनी असेल्या एसटीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक एसटी उशिरा सुटतात. काही वेळा अचानक रद्दही करण्यात येतात, परिणामी या मार्गावरील प्रवाशांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन प्रस्तावित फेऱ्या अद्याप सुरु करण्यात आल्या नाहीत, तसेच प्रवास करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्त्यांची अद्यापही दुरवस्था असल्याची तक्र ारही केली, अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशा रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते असे संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित के ले. पंचायत समीती, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, तालुका कृषी कार्यालय, बीएसएनएल, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग व अन्य विषयांवरही वादळी चर्चा झाली. सरकारी अधिकारी व कर्मचारी नागरिकांची कामे योग्य प्रकारे करत नाहीत, जाणीवपूर्वक विलंब करतात, परिणामी ग्रामस्थांचा वेळेचा अपव्यय होतोच सोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या तक्र ारींचा पाऊस पडला. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली तरी पोलादपूरमध्ये विकासाचं पाणी अजूनही पोहोचलेलंच नाही.यावेळी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, तहसीलदार के.डी.नाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अपर्णा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप भागवत, पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार,उपसभापती लक्ष्मण खेडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)