शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचे खाजगीकरण

By admin | Updated: February 20, 2016 02:11 IST

एनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईएनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. होणारा तोटा भरुन काढण्याच्या तसेच दर्जात सुधार आणण्याच्या दृष्टीने परिवहनकडून हा प्रयत्न होत असला तरी त्यात कितपत यश मिळेल हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.सन २०१४ मध्ये महासभेने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार परिवहनच्या गाड्या खाजगी ठेकेदारामार्फत चालवल्या जाणार आहेत. याकरिता नोव्हेंबर २०१५ मध्ये ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जे.एल.एल. या विदेशी कंपनीसह महालक्ष्मी ट्रॅव्हल्स व अ‍ॅन्थोनी यांच्या निविदा प्राप्त झालेल्या. त्यापैकी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची निविदा सर्वाधिक कमी दराची असल्याने त्यास मंजुरी मिळाली आहे. यानुसार सात वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड करण्यात आली असून यासंबंधीचा करार महिन्याभरात होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिवहनच्या झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली आहे.जेएनएनयूआरएम कडून परिवहनला मिळणाऱ्या १४५ व इतर ४० अशा १८५ गाड्यांचे खाजगीकरण होणार आहे. या गाड्यांच्या खरेदीसाठी परिवहनला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी ठेकेदाराकडून घेतला जाणार आहे. यानुसार गाड्यांचा देखभाल खर्च, इंधन खर्च व चालक ठेकेदाराचा असणार आहे. तर वाहक व कलेक्शनचे अधिकार परिवहनकडेच राहणार आहेत. परिवहनकडून ठेकेदाराला प्रति किलोमीटरप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी वोल्व्हो बससाठी ५८ रुपये, साध्या बससाठी ४१ रुपये तर मिडी बससाठी ३१ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत परिवहनला सरासरी ६० ते ७१ रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. करारनामा झाल्यानंतर १५ मार्चपासून या बसेस मार्गावर सुरु करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या निर्देशानुसार भोपाळ, इंदोर व ठाणेपाठोपाठ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने असा निर्णय झालेला आहे. सदर ठेकेदाराला परिवहनचा एक डेपो भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. त्याच ठिकाणी त्याच्या गाड्या उभ्या राहणार असून याचे संपूर्ण नियंत्रण हे परिवहनकडेच असणार आहे.> केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांसाठी मनपाला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी देखील ठेकेदारच भरणार आहे. खाजगीकरणामुळे एनएमएमटीच्या गाड्यांचा दर्जा सुधारणार आहे. शिवाय आजतागायत तोट्यात चाललेल्या परिवहनलाही नफा होणार आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक