शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरात खासगी क्लासेसचे पेव

By admin | Updated: April 19, 2016 02:37 IST

पूर्वी निकाल चांगला लागावा याकरिता शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्ण तयारी करून घ्यायचे. त्याकरिता अतिरिक्त तासिका घेतल्या जायच्या

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली पूर्वी निकाल चांगला लागावा याकरिता शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्ण तयारी करून घ्यायचे. त्याकरिता अतिरिक्त तासिका घेतल्या जायच्या. वेळप्रसंगी सुटीच्या दिवशी अतिरिक्त शिकवणी घेतली जायची. मात्र अलीकडे शिक्षण पूर्णपणे खासगी क्लासेसच्या आहारी जाऊ लागल्याने शाळेतील शैक्षणिक दर्जा घसरत आहे. पनवेल परिसरातील खासगी क्लासेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शाळेचे शुल्क त्याचबरोबर खासगी क्लासेसचे पॅकेज भरता भरता पालक मेटाकुटीला येत आहेत. शाळेत शिकवणारे विशेषत: विनाअनुदानित शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक हे खासगी क्लासेसमध्ये शिकवताना दिसतात. रहिवासी संकुल, सदनिका त्याचबरोबर गाळे भाडेतत्त्वावर घेऊनही अनेकांनी खासगी क्लासेस सुरू केले आहेत. पनवेल शहरातील बहुतांश शाळा विनाअनुदानित, खासगी स्वरूपात आहेत. याठिकाणी शिक्षकांना कमी वेतन दिले जाते. त्यामुळे याठिकाणी शिकवणारे शिक्षकही दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली अथवा खासगी क्लासमध्ये चांगले पैसे मिळत असल्यास नोकरी सोडून जात असल्याचे अनेकदा पालकांकडून ऐकायला मिळते. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच काही क्लासेसमध्ये अकरावी-बारावीसाठी प्रवेश सुरू करण्यात आला असून त्यासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येत आहे आणि या परीक्षेतील गुणांनुसार विद्यार्थ्यांना सवलतीही देण्यात येत आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञानात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वतंत्र क्लासेस असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पनवेलबरोबरच कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी शेकडो खासगी क्लासेस आहेत. नववी, दहावीकरिता ९0 हजार ते १लाख २0 हजार इतके पॅकेज या ठिकाणी घेतले जात आहे. अकरावी व बारावीकरिता १ लाख ते दीड लाख रुपये फी विद्यार्थ्यांकडून घेतली जात आहे.