गतीमंद मुलांना अन त्यांच्या पालकांनाही आपल्या पश्चात आपल्या गतीमंद मुलाची देखभाल कोणी करणार नाही म्हणून एका मातेने आपल्या मुलाची हत्या केल्याची बातमी वृत्तपत्रत वाचल्यावर मन सुन्न झाले. या मातेची अडचण तीच्या परिस्थितीनुसार तत्वता बरोबर वाटत असली तरी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊनये यासाठी आपण गतीमंद मुलांसाठी काहीतरी करावे ही इच्छा आपल्या मनात प्रबळ झाली. या इच्छेतून माधवराव गोरे यांनी गतीमंद मुलांच्या पालकांची ‘आधार’ ही संस्था स्थापन करुन गतीमंदांसाठी खरा आधार निर्माण करुन दिला.
संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार
आधार या संस्थेच्या कार्याची दखल आता केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रलयाने या संस्थेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधुन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारामुळे आमच्या कार्याला खरी ओळख मिळेल असा विश्वास संस्थेचे व्यवस्थापक गणोश आंबेकर यांनी व्यक्त केले.
पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
बदलापूरच्या मुळगांव परिसरात 1994 मध्ये गोरे यांनी दीड एकर जागेत गतीमंद मुलांची आधार ही संस्था सुरु केली. माधवराव गोरे हे स्वत: मुंबईत एका संस्थेत अपंग सेलचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना अपंग आणि गतीमंदांच्या कल्याण कार्याची ओढ पुर्वीपासूनच होती. आधार ही संस्था स्थापन करित असतांना त्यांनी 18 वर्षावरील गतीमंदांचा सांभाळ करणारी संस्था नसल्याची माहित घेतली. 18 वर्षापासून ते वयोवृध्द गतीमंद व्यक्तीसाठी आपली आधार संस्था कार्यरत ठेवण्यात त्यांना यश आले. संस्था स्थापन झाल्यावर सुरुवातीला अवघे पाच मुले होती. एका वर्षात ही संख्या 5क् वर गेली. संस्थेतील जिव्हाळा पाहून अनेक पालक हे आपल्या गतीमंद मुलांना याच संस्थेत पाठवित आहेत. आधार या संस्थेत आजच्या घडीला 2क्क् गतीमंद व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यात 5क् महिलांचाही समावेश आहे. या संस्थेला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याने आधारची दुसरी शाखा नाशिकला काढण्यात आली आहे. तेथेही 1क्क्हून अधिक गतीमंदांचे वास्तव्य आहे. दुबई, अमेरिका आणि
स्पेन या देशात वास्तव्यास असलेल्या पालकांच्या
मुलांचे संगोपन या संस्थेत करण्यात येत आहे.