शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत ३३४८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:22 IST

आरोग्य विभागच आयसीयूमध्ये गेला असून रूग्णालयात उपचारासाठी गेलेला रूग्ण सुखरूप परत येईल याची खात्री नसल्याची खंत व्यक्त केली.

नवी मुंबई : स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी ३३४८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर सादर केला. शहराच्या सर्वंकष विकासाच्या योजना मांडताना आरोग्य विभागाच्या कामकाजावर टीका केली. आरोग्य विभागच आयसीयूमध्ये गेला असून रूग्णालयात उपचारासाठी गेलेला रूग्ण सुखरूप परत येईल याची खात्री नसल्याची खंत व्यक्त केली.महापालिका आयुक्त रामास्वामी एन यांनी ३१५१ रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा होवून तब्बल १९७ कोटी रूपये वाढ करून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सभापतींनी तो अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला. उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, नगररचना शुल्क, हॉटेल परवाना शुल्क, अनधिकृत बांधकाम शुल्क, अग्निशमन विभाग, कार्यालयीन इमारती भाडे,पे अँड पार्क या धोरणातून उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशा सूचना केल्या. विकास योजना राबविताना आरोग्य सुविधा सक्षम करण्याची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये आरोग्य सेवा आयसीयूवर आहे. प्रथम संदर्भ रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये योग्य उपचार मिळत नाहीत. आवश्यक साहित्य व मशीनरी नाही. पुरेसे डॉक्टर नाहीत. पालिका रूग्णालयामध्ये एखादा रूग्ण गेला तर तोपुन्हा बरा होवून परत येईल याची खात्री राहिलेली नाही. लोकप्रतिनिधींनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलेले नाही. आरोग्य सेवेलाच सलाईन लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मनपा क्षेत्रामध्ये एकात्मिक पद्धतीने पाणी निचरा सुधारणा योजना राबवावी, टीटीटी औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते,पदपथ बंधणे, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे, गावठाण क्षेत्रामध्ये एकत्रित विकासकामे करणे. कंत्राटी कामगारांना थकबाकी देण्यात यावी.सिडकोनिर्मित वसाहतीमध्ये विकासकामे करण्यात यावी. जल विद्युत प्रकल्प उभारण्यात यावा. विष्णुदास भावेच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारणे, स्मशानभूमीत धुराडे बसविणे, फोर्टी प्लस, एपीजे अब्दुल कलाम, मदर तेरेसा व सेवालाल भवन बांधण्यात यावे.पादचारी पूल व इतर विकास कामे करण्यात यावी अशा सूचना सभापतींनी यावेळी केल्या आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या योजनांचा वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला असून प्रशासनाने तरतूद केलेली सर्व कामे मार्गी लावावी अशी सूचनाही सभापतींनी केली.