शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यावर शिवसृष्टीचा जिवंत देखावा सादर

By admin | Updated: December 26, 2016 06:13 IST

कोकण क्रीडा मित्रमंडळ, मुरूड नगरपरिषद व संदीपभाऊ मित्रमंडळाच्या वतीने जागर पद्मदुर्गाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

नांदगाव/ मुरूड : कोकण क्रीडा मित्रमंडळ, मुरूड नगरपरिषद व संदीपभाऊ मित्रमंडळाच्या वतीने जागर पद्मदुर्गाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रत्यक्ष पद्मदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवसृष्टीचा जिवंत देखावा सादर करून या सर्वांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांची वाहवा मिळवली. जागर पद्मदुर्गाच्या या कार्यक्रमात २५० लोकांनी सहभाग नोंदवून बहुतांशी लोकांनी शिवकालीन मावळ्यांचा वेष परिधान करून हातात भाले व ढाली घेऊन मुख्य दरवाजापाशी बसून पहारेकरी व अन्य वेष परिधान करून शिवकाळाची प्रचिती दिली.यावेळी उपस्थित मंडळांच्या पदाधिकारी वर्गाचे स्वागत नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी नगरसेविका वंदना खोत, दीपक शिंदे, सीमा दांडेकर, चंद्रकांत मोकल, कोकण क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पद्मदुर्ग किल्ल्यावर प्रकाशस्वामी जंगम यांनी विधिवत मंत्रोच्चार करून वातावरणात जागृती आणली, तर संदीप वाघपंजे यांनी अलिबाग येथून ज्योत आणून ती किल्ल्यावर तेवत ठेवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. स्थानिक नागरिक व पर्यटकांसाठी शिवरायांच्या काळातील युद्धकलांचा नजराणा पेश करण्यात आला. तलवारबाजी, दांडपट्टा व विविध कलागुण दाखवण्यात आले. शिवकाळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्र माची सुरु वात झाली होती. या कार्यक्र मातून शिवकाळात सागरी किल्ल्याचे महत्त्व पटवून देण्यात येऊन त्या वेळीही वेशभूषा, राहणीमान या गोष्टी सुद्धा देखाव्यामार्फत दाखवण्यात आल्या. हा कार्यक्रम लोकांना सहज पाहाता यावा, यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मोफत बोटीची व्यवस्था केली होती. हा किल्ला समुद ्रकिनाऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने समुद्राच्या मध्यभागी आहे. (वार्ताहर)