शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये लवकरच प्री-पेड रिक्षा योजना

By admin | Updated: October 6, 2016 03:54 IST

पनवेल रेल्वेस्थानक ए-वन नसल्याने येथे प्री-पेड रिक्षा योजनेला एमएमआरडीएकडून परवानगी मिळूनही रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव फेटाळला होता

कळंबोली : पनवेल रेल्वेस्थानक ए-वन नसल्याने येथे प्री-पेड रिक्षा योजनेला एमएमआरडीएकडून परवानगी मिळूनही रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव फेटाळला होता. मात्र याबाबत आरटीओ, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासन आणि प्रवासी संघाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल रेल्वेने घेतली आहे. या योजनेकरिता सकारात्मकता दर्शवली असून जागा देण्याची सहमती दिली आहे. त्यामुळे प्री-पेड रिक्षा सुरू करण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. पनवेलहून सीएसटी, वडाळा, अंधेरी, ठाणे, डहाणू या मार्गावर उपनगरीय रेल्वे गाड्या धावतात. पनवेल महापालिका झाल्याने आता शहरातील विकासकामांना वेग येणार आहे. त्यानुसार दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी - सुविधाही उपलब्ध होणार आहेत. सध्या शहरातील रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारण्यात येते. रिक्षाच्या प्री-पेड सेवेमुळे प्रवाशांना लाभ होईल. पनवेल रेल्वे, बस स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन प्री-पेड मीटर सुरू करण्याचा प्रस्ताव पनवेल प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. हा भाग एमएमआरडीएमध्ये येत असल्याने प्रस्ताव प्राधिकरणाकडे गेला. या कार्यालयाकडून स्थापन समितीने मंजुरीही दिली आहे. त्यानंतर आरटीओकडून जागा व सुविधा देण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीला सकारात्मकता दर्शवलेली नाही. मात्र आता रेल्वे प्रशासनाने योजनेकरिता सहमती असल्याचे पत्र आरटीओला दिले. रेल्वेचे स्थानक प्रबंधक पी.के.सिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.के.गुप्ता, मुख्य वाणिज्य निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी संयुक्त सर्व्हे केला. याकरिता रेल्वे जागा, पाणी, तसेच विजेची सोय करून देणार आहे. लवकरच ही योजना सुरू करणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.