शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय

By admin | Updated: October 6, 2016 03:52 IST

प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणात उभारलेल्या गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणात उभारलेल्या गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नही जलदगतीने सोडविले जातील, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने बुधवारी गगराणी यांची भेट घेवून विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशेषत: सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याने ती त्वरित थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहराच्या निर्मितीसाठी सिडकोने येथील शेतजमिनी संपादित केल्या आहेत. गावठाणांचे संपादन झालेले नाही. नियमाप्रमाणे संपादित न झालेल्या जमिनीवरील घरांच्या वाढीव बांधकामांसाठी कायदेशीर नकाशा मंजूर करून घेण्याची तरतूद कोणत्याही कायद्यात नाही. असे असतानाही सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सर्रास कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वप्रथम कोणती बांधकामे अधिकृत व कोणती अनधिकृत याची वर्गवारी करा. तोपर्यंत कोणत्याही बांधकामांवर कारवाई करू नये, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी केली. याप्रकरणी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले. या बैठकीत विविध चार विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन बंद करू नये, बेलापूर येथील मरीना प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करावे, बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करावी, प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडांची मालकी संबंधित संस्थेकडे हस्तांतरित करावी आणि संबंधित संस्थेच्या शाळेसाठी क्रीडांगण म्हणून जवळचा मोकळा भूखंड द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन गगराणी यांनी यावेळी दिले.या शिष्टमंडळात प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपाध्यक्ष मनोहर पाटील, विजय घाटे, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील व माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)