शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पूजाचा मृतदेह आज घरी आणणार

By admin | Updated: February 17, 2016 02:24 IST

रशिया येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या पूजाचा मृतदेह बुधवारी घरी आणला जाणार आहे. रशिया येथून विमानाने आणले जाणारे पार्थिव दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोचण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : रशिया येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या पूजाचा मृतदेह बुधवारी घरी आणला जाणार आहे. रशिया येथून विमानाने आणले जाणारे पार्थिव दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोचण्याची शक्यता आहे. यानंतर सीवूड येथील राहत्या घरी तिचा मृतदेह आणला जाणार आहे.वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनींच्या अपघाती मृत्यूची घटना घडली आहे. इन्स्टिट्यूटच्या निवासी भागात लागलेल्या आगीमुळे राहत्या खोलीत गुदमरून पुण्याची करिष्मा भोसले हिच्यासह पूजाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पूजाच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवण्यात रशियाच्या स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीने हलगर्जीपणा केल्याचा तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. अखेर भारतीय राजदूताच्या मदतीने त्यांना घटनेची माहिती मिळवावी लागली. यावेळी आगीमध्ये पूजाचा मृत्यू झाल्याचे त्यांना घटनेनंतर तब्बल ७ ते ८ तासांनी समजले. दरम्यान, मयत पूजाचे वडील सिद्दपा यांनी दुर्घटनेचा अहवाल मागवणार असल्याचे सांगितले आहे. मयत पूजाचे पार्थिव बुधवारी भारतात आणले जणार आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोचणार आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत सीवूड येथील राहत्या घरी तिचा मृतदेह आणला जाणार आहे. त्या ठिकाणी तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)