शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ

By admin | Updated: June 1, 2017 05:33 IST

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करीत पनवेल महानगरपालिकेच्या

वैभव गायकर / लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करीत पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत ५१ जागा जिंकत एकहाती सत्ता आणली. विशेष म्हणजे एकीकडे महाआघाडी स्थापन करीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसची भाजपाला दिलेली झुंज अपयशी ठरल्याने या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडीला सुरुवात झाली असून पक्षाला आलेल्या अपयशाने राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीने शेकापसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेकापसोबत या दोन्ही पक्षाला आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी पक्षनेतृत्वाने पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे समजते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी पालिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत आलेल्या अपयशाबद्दल घरत यांनी हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जाते. तर राष्ट्रवादीने तालुका प्रमुख पदी प्रभाग क्र मांक ९ मधून नगरसेवक पदी निवडून आलेल्या सतीश पाटील यांची निवड केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांना अवघ्या दोन जागा मिळाल्या असल्याने नजीकच्या काळात दोन्ही पक्षांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन देखील पक्षाला साधा भोपळा पण फोडता आला नसल्याने पक्षनेतृत्व मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे समजते. निवडणुकीपूर्वीच तालुका प्रमुख वासुदेव घरत यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश प्राप्त होणार नाही असे भाकीत त्यांनी राजीनामा देतेवेळी व्यक्त केले होते आणि झालेही तसेच. ग्रामीण भागातील तालुका प्रमुख रामदास पाटील यांना देखील प्रभाग क्रमांक १ मधून पराभवाची धूळ चाखावी लागल्याने पनवेलमधील शिवसेना संकटात आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे, सचिव आदेश बांदेकर यांचा करिष्मा देखील पक्षाला तारू शकला नसल्याने शिवसेनेला पनवेलमध्ये विचार विनिमयाची आवश्यकता आहे. मनसेची अवस्था देखील अगदी बिकट होऊन बसली आहे. मनसेने उभ्या केलेल्या २५ उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने पनवेलमध्ये मनसे हद्दपारीच्या मार्गावर आहे. जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. केसरीनाथ पाटील यांनी २००९ साली पनवेल विधानसभा मतदार संघातून आमदारकी लढविली आहे. शेकापला देखील पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. २३ जागा जिंकून शेकाप दोन नंबरवर फेकला गेला. शेकापला देखील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शहरी मतदारांच्या प्रश्नांसंदर्भात अथवा समस्यांसंदर्भात ठोस भूमिका बजावावी लागेल अन्यथा त्याचा फटका त्यांना बसू शकतो. विशेष म्हणजे स्थानिक पक्ष म्हणून शेकापला आपली ओळख पुसून टाकावी लागणार आहे. भाजपाने विकासाचा मुद्दा पुढे करून लढविलेल्या निवडणुका त्यांच्या यशाला कारणीभूत असल्याने भविष्यात निवडणुका याच मुद्द्यावर लढाव्या लागणार असल्याचे पनवेल महानगर पालिका निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. केवळ आरोप- प्रत्यारोपणाच्या राजकारणावर निवडणुका जिंकता येणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. शेकापला मोठा धक्कापनवेल तालुक्यातील सर्वात मजबूत पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. भाजपाला कडवे आव्हान निर्माण करण्याचे काम केवळ शेकापनेच पनवेलमध्ये केले होते. मात्र शेकापची विचारधारा शहरी मतदारांपर्यंत पोहचू शकली नसल्याने शहरी भागात शेकापला मोठा फटका बसला.