शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमन करताना पोलिसांची दमछाक

By admin | Updated: May 17, 2015 23:19 IST

सायबर सिटीची पहिली वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यंत्रणेवर

नवी मुंबई : सायबर सिटीची पहिली वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यंत्रणेवर पडत आहे. अरुंद रस्ते, रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या झेब्रा क्रॉसिंगचा अभाव, त्यातच फेरीवाल्यांचे दुतर्फा अतिक्रमण यामुळे वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाशीत वाहनांची मोठी वर्दळ असते. विविध कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स, मोठमोठे शोरूम्स, बांधकाम विकासकांची कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, शाळा व महाविद्यालये आदींमुळे वाशीचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. विविध कामांनिमित्त शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांचीही येथे वर्दळ असते. याचा परिणाम म्हणून या परिसरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांनाही अनेकदा वाहन कोंडीचा फटका बसतो.अपुरे मनुष्यबळ आणि अत्यावश्यक सुविधांअभावी वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे दैनंदिन नियमन करताना कसरत करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही दळणवळण सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी थेट महापालिकेला साकडे घातले आहे. वाशी-कोपरखैरणे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्याला आळा घालण्यासाठी या मार्गावरील शिवाजी चौक, फायर ब्रिगेड चौक, ब्लू डायमंड चौक तसेच सेक्टर-१७ येथील वाशी प्लाझा, महात्मा फुले चौक रेल्वे स्थानकाजवळील सेंटर वन चौक व संभाजी चौक या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत आहेत. पण अनेक वाहनचालक सिग्नलला जुमानत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी तसेच वाहनांची समान गती राखण्यासाठी सिंक्रोनायझेशन सिग्नल यंत्रणेचा अवलंब करावा, अशी विनंती पवार यांनी महापालिकेकडे केली आहे. वाशी वाहतूक शाखेंतर्गत खाडीपूल ते जुई पूल हा महामार्गाचा भाग येतो. वाशी गाव, स्टेशनपासून कोपरखैरणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू डायमंड चौकापर्यंतच्या भागाचा यात समावेश आहे. संपूर्ण परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरील वाशी उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी आहे. वाहतुकीसंदर्भातील कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांना या चौकीत यावे लागते. (प्रतिनिधी)