शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तराफ्यासाठी पोलिसांत धाव

By admin | Updated: March 9, 2016 03:45 IST

तालुक्यातील मांडवा येथील प्रवासी जेटीला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून तराफा बसविण्यात आला होता. मात्र मार्च २०१५ मध्ये त्या तराफ्याचा समुद्राला आलेल्या उधाणापुढे टिकाव लागला नाही

अलिबाग : तालुक्यातील मांडवा येथील प्रवासी जेटीला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून तराफा बसविण्यात आला होता. मात्र मार्च २०१५ मध्ये त्या तराफ्याचा समुद्राला आलेल्या उधाणापुढे टिकाव लागला नाही. त्या घटनेनंतर तो तराफा तेथून हटविण्यात आला होता. सार्वजनिक हितार्थ त्या तराफ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती या प्रकरणामधील अनियमितता उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन मोठ्या संख्येने वाढत आहे. मुंबईहून येणारे पर्यटक हे गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा जेटी असा प्रवास करतात. जलमार्गे प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज होती. बोटीतून जेटीवर जाण्यासाठी प्रवाशांना भरतीच्या वेळी मोठी कसरत करावी लागायची. त्यामध्ये प्रामुख्याने महिला, लहान मुले आणि वृध्दांना जास्त त्रास व्हायचा. यावेळी अपघातही झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने २०१२ मध्ये मांडवा येथे जेटीवर तराफा बसविण्याला मंजुरी दिली. ओशियन ब्लू कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. सुमारे पाच कोटी रुपयांचे हे कंत्राट होते. २०१२ मध्ये मंजूर झालेला तराफा जेटीजवळ बसविण्यासाठी २०१५ उजाडले, मात्र मार्च २०१५ मध्ये भरतीच्या प्रचंड उधाणापुढे त्याचा टिकाव लागला नाही. भरतीच्या पाण्यात तो तराफा कलंडला गेला होता. त्यानंतर मेरीटाइम बोर्डाने तो तेथून हलविला होता.या कालावधीमध्ये पर्यटनाचा एक हंगाम संपला तर आता दुसरा हातातून जात आहे, तरी तराफा बसला नसल्याचे सावंत यांनी सांगितले. सावंत यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीमध्ये हा तराफा प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आला होता. प्रायोगिक तत्त्वावर तराफा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा कशासाठी, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)