शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या आमिषाने गंडा

By admin | Updated: September 2, 2015 03:52 IST

पोलीस खात्यात भरती करून देतो सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चौदा जणांची फसवणूक केल्याचे समोर आले

नवी मुंबई : पोलीस खात्यात भरती करून देतो सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चौदा जणांची फसवणूक केल्याचे समोर आले असून राज्यभरातील अनेकांना त्यांनी फसवल्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाला मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या प्रशस्तिपत्राचाच वापर तो स्वत:ला पोलीस असल्याचे सांगण्यासाठी करायचा.नवी मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर भरती करून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे आली होती. स्वत:ला पोलीस सांगणाऱ्या एका अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी या उमेदवाराकडून भरतीसाठी ४ लाख रुपये घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर तो गायब व्हायचा. यासंबंधीचा गुन्हा दाखल होताच नेरूळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राजेंद्र सपकाळ, संदीप चव्हाण, नारायण राव व रवींद्र सागवेकर अशी त्यांची नावे आहेत. सपकाळला न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतर तिघे अद्याप कोठडीत आहेत. या टोळीने सातारा, सांगली परिसरातील अनेक तरुणांना पोलीसमध्ये भरती करून देतो, असे सांगून लाखोंची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यापैकी १४ गुन्ह्यांची कबुलीही त्यांनी दिल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.फसवणुकीची तक्रार दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो, निरीक्षक नागराज मजगे, जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. गतवर्षीच्या नवी मुंबई पोलीस भरतीदरम्यान नेरूळ रेल्वे स्थानकालगत चव्हाणच्या कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखती व्हायच्या. सपकाळच्या माध्यमातून या सर्वांची एकमेकांशी ओळख झाली होती. यामध्ये पोलीस मुख्यालयात कामाला असल्याचे सांगणाऱ्या एका शिंदे नावाच्या पोलिसाचाही समावेश आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस मुख्यालयातल्या शिंदेशी आपली ओळख असल्याचे सांगून सागवेकर व सपकाळ हे दोघे भरतीसाठी इच्छुकांचा शोध घ्यायचे. त्यापैकी ३ ते ४ लाख रुपये देण्याची तयारी असलेल्यांना नेरुळ येथे चव्हाणच्या जॉब प्लेसमेंट कार्यालयात बैठका व्हायच्या. त्याठिकाणी बनावट स्टँप वापरून पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याची बनावट पत्रेही त्यांनी अनेकांना दिलेली आहेत. तक्रारदार तरुणाने नेरुळच्या याच जागेची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु कार्यालय व मोबाइलचे नंबर बदलल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शिताफीने अटक केल्याचे उपआयुक्त उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)