शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील १३ मुलींना विषबाधा

By admin | Updated: March 1, 2016 02:37 IST

कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भक्ताची वाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना रविवारी मध्यरात्री अन्नातून विषबाधा झाली आहे

नेरळ :कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भक्ताची वाडी येथील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना रविवारी मध्यरात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. दुपारपर्यंत विषबाधा झालेल्या १३ मुलींपैकी दोन मुलींना उपचार करून सोडले असून, अन्य ११ मुलींवर उपचार सुरू आहेत.भक्ताची वाडी आदिवासी आश्रमशाळेतील मुली रविवार रात्रीचे जेवण उरकून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत होत्या. त्यातील काही मुलींना पहाटे तीनच्या सुमारास उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यांच्या सहकारी मैत्रिणी यांनी आश्रमशाळेचे पुरुष मुख्याध्यापक मुकुंद पाटील यांना सदर घटनेची माहिती दिली. तेथे मुलींची आश्रमशाळा असतानादेखील महिला मुख्याध्यापक पद आदिवासी उपयोजनेकडून सातत्याने मागणी होऊन देखील भरले जात नाही. तेथे आॅन ड्युटी असलेले मुख्याध्यापक पाटील यांनी विषबाधा झालेल्या सर्व १३ मुलींना प्राथमिक उपचार करण्यासाठी भक्ताची वाडी आश्रमशाळा येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबीवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे कोणीही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्वांना कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्या सर्व विषबाधा झालेल्या मुलींवर कशेळे ग्रामीण रुग्णालयात तेथील अधीक्षक डॉ. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पहाटे आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि उपचार सुरू केले.विषबाधा झाल्याची माहिती एका विद्यार्थिनीने आपल्या घरी पहाटे कळविली. त्यावेळी पालकांनी कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे पदाधिकारी जैतू पारधी, थोराड यांना माहिती देताच ते दोघे कशेळे येथे सकाळी पोचले. त्यांच्या उपस्थितीत विषबाधा झालेल्या सर्व मुलींवर अधिक लवकर उपचार करण्यात आले. दोन मुलींची प्रकृती सुधारली असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. (वार्ताहर)