शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:47 IST

सहा वर्षे काम बंद; ५४ कोटी ४६ लाखांची फेरनिविदा

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-५ येथील नाट्यगृहासाठी आरक्षित मोकळ्या भूखंडावर गेल्या ६ वर्षांपासून बांधकाम करण्यात न आल्याने, आता त्या भूखंडाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे ही वास्तू ठरावीक कालावधीत उभारण्यात महापालिकेच्या संबंधित विभागाला सपशेल अपयश आल्याचे ऐरोलीकरांना नाट्यगृहासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नवी मुंबई महापालिकेचे वाशीत विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे.या नाट्यगृहाबरोबरच ऐरोली परिसरातही एक नाट्यगृह असावे, यासाठी पालिकेने सहा वर्षांपूर्वी अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. ऐरोलीच्या मध्यभागी सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर २८९३.२९ क्षेत्रफळावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या उभारणीला मे. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सुरुवात केली. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खड्डा खोदला. मात्र, त्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत कंत्राटदाराने पुढे या नाट्यगृहाचे काम केलेच नाही. पालिकेने सहा वेळा नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या. प्रतिसाद न मिळाल्यामुळे सहा वर्षे काम रखडले आहे.दोन मजल्याचे हे नाट्यगृह बांधण्यासाठी सहा वर्षांपूर्वी दोन ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. आता चार मजल्याचे नाट्यगृह बांधण्यात येणार असून, त्यासाठी ५४ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फेरनिविदा मागविली आहे. येत्या दोन वर्षांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, ऐरोली विभागया खड्ड्यात दोन वर्षांपूर्वी एका महिलेने मुलासहित आत्महत्या केली. त्यानंतर, आणखी एका महिलेनेने आत्महत्या केली. यावरून नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येते. नंतर त्या ठिकाणी चारही बाजूने ठिकठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत.- संजय शेळके, अध्यक्ष, माऊली व्यापारी संकुल, ऐरोली