शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह रखडविण्याचे नाटक

By admin | Updated: March 3, 2016 02:52 IST

ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. गतवर्षी अर्थसंकल्पात १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली, पण प्रत्यक्षात ३८ लाख रुपयांचेच काम केले असून पुढील वर्षीसाठीही फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवी मुुंबईमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे रखडविली जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक करू लागले आहेत. ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना त्यांच्या प्रभागात तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ मध्ये नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. एका वर्षामध्ये काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात मात्र एक वर्षापासून काम ठप्प झाले आहे. महानगरपालिकेने २०१३ मध्ये २९ लाख ३७ हजार रुपये खर्च केले होते. पुढील २०१४ मध्ये ११ लाख ७७ हजार रुपये खर्च केले. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये तब्बल १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु डिसेंबरपर्यंत फक्त ३८ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर येथील काम थांबविण्यात आले आहे. मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे काम थांबविले असल्याची चर्चा ऐरोलीमध्ये सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामध्ये ऐरोलीकरांचे मात्र नुकसान होऊ लागले आहे. महापालिकेने २०१५ - १६ च्या अर्थसंकल्पामध्येही या कामासाठी फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यावर्षीही नाट्यगृहाचे काम रखडविण्यात येणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिका एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करीत नाही. कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे कामावरील खर्च प्रचंड वाढत आहे. यापूर्वी महापालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नेरूळ, बेलापूरमधील रुग्णालये यांचा खर्च प्रचंड वाढला होता. ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम रखडवून या प्रकल्पाचा खर्चही वाढविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेकडे पैसे नव्हते तर या कामाचे भूमिपूजन का केले, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.