शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये प्लास्टिकचे अंडे

By admin | Updated: May 26, 2017 00:32 IST

प्लास्टिकच्या अंड्यांमुळे हैद्राबादला मध्यंतरी खळबळ माजली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती नवीन पनवेलमधील सुकापूर येथे बुधवारी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : प्लास्टिकच्या अंड्यांमुळे हैद्राबादला मध्यंतरी खळबळ माजली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती नवीन पनवेलमधील सुकापूर येथे बुधवारी झाली. शिवा कॉम्प्लेक्समधील एका दुकानातून ग्राहकाने सात अंडी खरेदी केली. त्यातील एक अंडे प्लास्टिकचे असल्याचे उघड झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सुकापूर येथे राहणारे देवासग्यम विणकर यांनी सुकापूरमधील शिवा कॉम्प्लेक्स येथील एका दुकानातून ३० रुपयांची सहा अंडी खरेदी केली. दुकानदाराने देवासग्यम यांना त्या अंड्यावर एक अंडे मोफत दिले. सात अंडी घेवून घरी गेल्यानंतर सकाळी कामावर जाण्यापूर्वी टिफीनसाठी अंडी बनवली असता, त्यात एक अंडे प्लास्टिकचे असल्याचे त्यांच्या पत्नीला आढळून आले. त्यांनी पतीला ते दाखविले. त्यानंतर देवासग्यम यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षात त्यांनी संपर्कासाठी फोन लावला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. संबंधित प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदविली. खांदेश्वर पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत मदत घेऊन सत्यता पडताळून पाहणार असल्याचे सांगितले. या घटनेसंदर्भात साहाय्यक पोलीस निरीक्षक नांगरे, पोलीस हवालदार विजय यादव हे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ जयराज छापरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहे.