शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पार्किंग आराखड्यासाठी नियोजनबद्ध आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:52 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे.

नवी मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, त्याकरिता पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पालिका अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची बैठक घेऊन शहरातील पार्किंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी नियोजनबद्ध आखणीद्वारे शहरात स्मार्ट सर्वसमावेशक पार्किंग धोरण तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. रहिवासी इमारती उभारल्या जाताना वाहन पार्किंगकडे दुर्लक्ष होत आहे, तर वाणिज्य संकुल, मॉल या ठिकाणीही नियोजनाकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांवर वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, सतत रहदारी असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा अवैध वाहनतळ तयार झाले आहेत. यामुळे वाहतूककोंडीसह छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत, तर सिडको विकसित नोड व गावठाणांभोवती असलेली खेळाची मैदानेही वाहन पार्किंगने व्यापली आहेत. अशातच शहरवासीयांकडून वाहन खरेदीवरही भर दिला जात असल्याने भविष्यात पार्किंगची समस्या अधिक वाढणार आहे. याची दखल घेत पालिकेने पुढील १५ वर्षांच्या पार्किंगच्या नियोजनासाठी हालचाली सुरू केल्या. त्याकरिता शुक्रवारी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली.सदर बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, अमोल यादव, वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, नगररचनाकार सतीश उगिले, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आदी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध करण्यासाठी वाहनतळांसाठी जागेची उपलब्धता हा महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. सध्या पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा आणि भविष्यातली गरज याबाबत सूचना केल्या.

टॅग्स :Parkingपार्किंग