शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फुले-आंबेडकर साहित्य मुख्य प्रवाहात येणे गरजेचे

By admin | Updated: April 10, 2017 06:12 IST

फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी

नवी मुंबई : फुले-आंबेडकरी साहित्य चळवळ ही मुख्य साहित्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, त्याची फार मोठी जबाबदारी नवे साहित्यकारांवर आहे, असे मत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी वाशी येथील बुद्ध प्रतिष्ठान सभागृहात आयोजित फुले-आंबेडकर साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. फुले-आंबेडकर साहित्यकारांनी साहित्य चळवळ अधिक लोकाभिमुख करत बौद्धिक विचारवंत यांना एकत्र करणे गरजेच असल्याचे विचारही डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले.वाशी शिवाजी चौक येथून साहित्य दिंडीने या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. १९६१ सालापासून देशातील नवं बुद्ध यांना घटनेच्या कोणत्याच कायद्यात समाविष्ट केले गेले नसल्याची खंत या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. राजकारण्यांकडून मोठी फसवणूक झाली असून त्यामुळे नोकरी, शिक्षण आणि विविध शासकीय योजना यापासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी डोंगरगावकर यांनी व्यक्त केली. भगवा दहशतवाद देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरा धोका आपणास देशांतर्गत वाढत चाललेल्या धर्मांध शक्तीपासून असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. संमेलनातील आंबेडकरी वाद साहित्य आणि समाज या विषयावरील परिसंवादात बोलताना परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दत्ता हेगडे यांनी लोकशाहीला सुसंगत आंबेडकरी वाद असल्याचे सांगितले, तर प्रा. शुक्राचारी गायकवाड यांनी साहित्यकार, विचारवंत या समाजातील प्रबोधन करणाऱ्या घटकांनी फुले-आंबेडकर विचारधारा सांगत असताना जुन्या रूढी, अनिष्ट प्रथा यावर आसूड उभारले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. प्रसिद्ध कवियत्री विद्या शिर्के-बाळदकर यांनी सदर संमेलनाचे सूत्रसंचालन काव्यात्मय शैलीत करून रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात प्रा. रेखा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्यात महिलांचे योगदान या विषयावर शारदा नवले, उषा आंबोरे, शीला जाधव आणि शोभा कांबळे यांनी आपले विचार मांडले. या वेळी शाहीर कुंदन कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. सायंकाळी बहारदार कवी संमेलन झाले.