शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

पनवेल महापालिके साठी जनतेचाकौल कु णाला?

By admin | Updated: May 26, 2017 00:19 IST

स्थापनेपासून विविध विषयांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, २६ मे रोजी लागणार आहे

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : स्थापनेपासून विविध विषयांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, २६ मे रोजी लागणार आहे. सकाळी १० वाजता प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहा विभागीय कार्यालयांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालानंतरच पालिकेवर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. २० प्रभागांत ७८ जागांसाठी एकूण ५५ टक्के मतदान बुधवार, २४ मे रोजी पार पडले. भाजपा -आरपीआय युती, शेकाप -राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी, शिवसेना अशी ही तिरंगी लढत असून, या लढतीत जनतेने कोणाला कौल दिला आहे, ते आज स्पष्ट होणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागांत एकूण ४ लाख २५ हजार ४६४ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ९६ हजार ७९० महिला, तर २ लाख २८ हजार ६७४ पुरुष मतदार आहेत. पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांमध्ये काही प्रमाणात अनुत्साह दिसून आला. सुट्ट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का ५५च्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे तब्बल १ लाख ९२ हजार ३६९ मतदारांनी मतदानच केले नाही. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पालिकेने राबविलेल्या विविध योजनादेखील या मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या ७८ जागांसाठी एकूण ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनतेने काय कौल दिला आहे, याची सर्वच उमेदवारांना चिंता लागलेली असून, निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. तर पनवेल महानगरपालिकेत कोणता पक्ष विजयी होणार, याकरितादेखील सट्टा लागला असल्याची माहिती मिळते. निकालावर कोट्यवदी रुपयांचा सट्टा लागला असल्याचे समजते. मतमोजणीची ठिकाणेपालिकेच्या एकूण २० प्रभागांसाठी प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. सहा ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्या ठिकाणी प्रभागनिहाय मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. पनवेल महापालिका निवडणूक प्रक्रि येसाठी मनपा हद्दीत प्रभागनिहाय सहा केंद्र तयार करण्यात आली आहेत. यात प्रभाग क्र मांक १, २, ३साठी रयत शिक्षण संस्थेचे नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज, प्रभाग ४, ५, ६साठी खारघरमधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, प्रभाग ७, ८, ९, १०साठी कळंबोलीतील काळभैरव इमारत, प्रभाग ११, १२, १३साठी कामोठे न्यू इंग्लिश स्कूल, प्रभाग १४, १५, १६साठी पनवेलमधील के. व्ही. कन्या विद्यालय आणि प्रभाग १७, १८, १९, २०साठी कोएसोचे पनवेल येथील इंदूबाई वाजेकर माध्यमिक शाळा या केंद्रांचा समावेश आहे. एकाच वेळी या सहा केंद्रावर मतदान मोजणी होणार आहे. साधारणत: दुपारी १२ वाजता विजयी उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.