शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By admin | Updated: September 8, 2016 03:10 IST

रायगड जिल्हा स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहावा यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.

आविष्कार देसाई , अलिबागरायगड जिल्हा स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहावा यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. मात्र रायगडच्या ग्रामीण भागातील काही नागरिकांना त्याचे काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. स्वच्छता अभियानासाठी कंबर कसणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेने आता शौचालय न बांधणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी त्यांनी बुधवारी एक आवाहन पत्र प्रसिध्द करुन तसा इशाराच स्वच्छता अभियानाला खीळ घालणाऱ्यांना दिला आहे.गेल्याच महिन्यामध्ये ‘गाठीभेटी स्वच्छतेसाठी’ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. वार्षिक कृती आराखड्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबापर्यंत पोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या अभियानासाठी जंगजंग पछाडत आहेत. परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद प्राप्त होत नसल्याचे दिसून येते. गाठीभेटी घेऊन, जनजागृती करुन, पोस्टरबाजी करुन, जाहिराती, मोठमोठे होर्डिंग्ज लावूनही ग्रामीण भागातील काही नागरिकांची मानसिकता पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही बदलताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना कायद्याचा धाक दाखविणे गरजेचे असते.याचसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने शौचालय नसणाऱ्यांना विनम्र आवाहन करणारे पत्र काढले आहे. एक पाऊल स्वच्छतेकडे टाकून स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी घर तेथे शौचालय बांधावे आणि सार्वजनिक आरोग्यमान उंचवावे, असे आवाहन त्या पत्रात केले आहे. त्याचप्रमाणे शौचालय नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ नुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शौचालयाची उभारणी न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येतील. विविध सरकारी योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा सज्जड दमचा देण्यात आला आहे.प्रशासनाच्या या कारवाईच्या बडग्याचा धसका घेऊन किती शौचालयाची उभारणी होणार आहे हे लवकरच समोर येईल, तसेच प्रशासन खरेच कारवाईचा बडगा उगारुन नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणार का असाही प्रश्न पडला आहे. पाणी व स्वच्छता विभागाने तयार केलेल्या आवाहन पत्राचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अविनाश सोळंके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. पी.डी. पाटोदकर आदी उपस्थित होते.