शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेकापची सिडकोवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:29 IST

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील १८ नागरी समस्या महिनाभरात न सोडविल्यास सिडको

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील १८ नागरी समस्या महिनाभरात न सोडविल्यास सिडको मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. या मोर्चात माजी आमदार विवेक पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामशेठ करावकर, जे. एम. म्हात्रे, सरपंच अंजली ठाकूर, माजी उपसरपंच संजय घरत, ग्रामपंचायत सदस्य अशोक गिरमकर, गुरु नाथ गायकर आदी उपस्थित होते. खारघरच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, सांस्कृतिक सभागृह, आरोग्याच्या समस्या, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नसणे आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर अतिक्र मण केले आहे, कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शेकापने खारघरच्या सिडको कार्यालयावर मोर्चा काढून सिडको अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परिसरातील समस्यांचे त्वरित निराकरण न केल्यास सिडकोच्या मुख्यालयावर मोर्चा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शेकापचे कार्यकर्ते भिडले सिडको कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर बाळाराम पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांशी परिसरातील समस्यांवर बोलत असताना, विजय पाटील यांनी गोखले शाळेच्या मैदानाचा विषय काढला. या वेळी अशोक मोरे यांनी तो वेगळा विषय असल्याचे सांगितले असता मोरे आणि पाटील यांच्यात वाद झाला. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षक, पोलीस, कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. खारघर परिसरात मार्चअखेर तीन विरंगुळा केंद्र उभारून नागरिकांसाठी खुले केले जाईल, कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय, वसाहतीसाठी दोन सांस्कृतिक सभागृह आणि गावनिहाय समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चपर्यंत पाणीटंचाई दूर होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित सिडकोचे अधिकारी प्रदीप डहाके, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गिरी यांनी व्यक्त केला. आमदारांवर टीका शेकाप गेल्या दहा दिवसांपासून आंदोलनाचे नियोजन करीत आहे. याची चाहूल लागताच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घाई गडबडीत सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या २६ मैदाने व उद्यानांचे भूमिपूजन केले. उद्यानांच्या विकासासंदर्भात शेकाप अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत असून आमदार खोटे श्रेय घेत असल्याचा आरोप शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी केला. ... तर कार्यक्र म उधळून लावूसिडकोमार्फत खारघरमध्ये विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्र मात स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यापुढे असे झाले तर कार्यक्र म उधळून लावू असा इशारा देखील यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी दिला .