शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांअभावी रुग्णांची हेळसांड

By admin | Updated: October 15, 2016 07:02 IST

स्त्रीरोग तज्ज्ञाच्या अनुपस्थितीमुळे गरोदर महिलांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी ऐरोलीतील पालिका रुग्णालयावर धडक

नवी मुंबई : स्त्रीरोग तज्ज्ञाच्या अनुपस्थितीमुळे गरोदर महिलांची गैरसोय होत असल्याच्या कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी ऐरोलीतील पालिका रुग्णालयावर धडक दिली. यावेळी नियुक्ती होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खुर्ची दालनाबाहेर मांडून आंदोलन करण्यात आले. कोट्यवधी खर्चून उभारलेल्या रुग्णालयात सुविधाच मिळत नसल्याचा संताप रुग्णांनी व्यक्त केला. महापालिकेच्या वतीने ऐरोली येथे बांधण्यात आलेल्या रुग्णालयात डेंग्यू, मलेरियाच्या चाचणीसाठी गेलेल्या रुग्णांना तासभर थांबवल्यानंतर ऐनवेळी वाशीच्या रुग्णालयात पाठवले जात आहे. याठिकाणी गरोदर महिलांचीही हेळसांड होत असल्याची तक्रार मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बानखेले यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बानखेले यांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयाला भेट दिली. एकही तज्ज्ञ उपस्थित नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याची खुर्ची दालनातून रुग्णालयाबाहेर मांडून त्यांनी आंदोलन केले.रुग्णालयात सद्यस्थितीला एकच स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कामाची वेळ संपल्यानंतर पर्यायी स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसतात. यादरम्यान एखादी महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यास तिला वाशी रुग्णालयात पाठवले जाते. अनेकदा वाशीला गेलेल्या गरोदर महिलांना त्याठिकाणी दाखल करुन न घेता परत पाठवले जात असल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. शिवाय काही महिलांची वाशी रुग्णालयात प्रसूती केल्यानंतर काही तासातच त्यांना नवजात बालकासह ऐरोली रुग्णालयात हलवले जाते. या प्रकारातून महिलेसह तिच्या बालकाच्या जिवाशी खेळण्याचे काम पालिकेचा आरोग्य विभाग करत असल्याने रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे. सुविधा मिळणार नसतील तर रुग्णालये उभारली कशाला असा प्रश्न बानखेले यांनी उपस्थित केला. याप्रकरणी बानखेले यांच्यासह चंद्रकांत सोनावणे व इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)