शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामाचा प्रवाशाला फटका

By admin | Updated: February 20, 2016 02:05 IST

रेल्वे प्रशासनाच्या निडी थांब्यावर काम सुरू असून ते अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याच अर्धवट कामाचा एका प्रवाशाला फटका बसला असून त्यामुळे त्यांना आपल्या पायाचा पंजा गमवावा लागला आहे.

रोहा : रेल्वे प्रशासनाच्या निडी थांब्यावर काम सुरू असून ते अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. याच अर्धवट कामाचा एका प्रवाशाला फटका बसला असून त्यामुळे त्यांना आपल्या पायाचा पंजा गमवावा लागला आहे.सदानंद खरीवले (रा. भातसई ) असे या प्रवाशाचे नाव आहे. निडी येथील नव्या प्लॅटफार्मवरील सिमेंट ब्लॉकच्या अर्धवट कामामुळे खोल खड्ड्यात सदानंद खरीवले यांचा गाडीतून उतरताना डावा पाय अडकला. क्षणार्धात पायावरून गाडी गेल्याने त्यांना पायाचा पंजा गमवावा लागल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यांना वेळेत पाय बाहेर काढता न आल्याने त्यांच्या पायावरून रेल्वे गेली. त्यात गंभीर जखमी झाल्याने खरीवले यांना तातडीने खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यानंतर रोहा ग्रामीण रुग्णालयात आणले. पुन्हा त्यानंतर मुंबई येथे अधिक उपचारार्थ हलविण्यात आले.निडी रेल्वे थांब्याचे काम सुरू आहे. तसेच त्या कामांतील त्रुटी व अर्धवटपणा मुख्यत: सिमेंट ब्लॉक खड्डे अनेक प्रवाशांच्या जिवावर बेतत आहेत. महत्वाचे म्हणजे निडी थांब्यावर वीज नाही. त्यामुळे अंधारात चाचपडत गाडीत चढावे लागत आहे. उतरताना प्रवाशांना कायम हा धोका पत्करावा लागत आहे. याच रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने सदानंद खरीवले यांना पाय गमवावा लागला. थांब्यावर वीज नसल्यानेही हा प्रकार घडला असल्याचेही इतर प्रवाशांनी सांगितले.