शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील उद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: May 22, 2017 02:13 IST

सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : सध्या सर्वत्र शाळांना सुट्या लागल्याने मुले वेगवेगळे खेळ खेळण्यात मग्न झालेले दिसतात. नेरळमधील अनाजी दळवी पार्कमध्ये सकाळी, सायंकाळी मुले खेळण्यासाठी येतात. तसेच ज्येष्ठ नागरिकही सायंकाळी या उद्यानात येतात; परंतु उद्यानाची दुरवस्था झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. बाकडे तुटलेले असल्याने बसण्यासाठी जागा नाही. घसरगुंडीही तुटली असल्याने मुलांना खेळताना जखमी होण्याची भीती आहे. संरक्षक जाळीही तुटली आहे. पार्कमध्ये खेळण्याच्या साहित्याची कमतरता आहे. वारंवार तक्रार करूनही नेरळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ गणपती घाटाजवळ अनाजी दळवी पार्क आहे. दळवी यांनी अनेक वर्षांपूर्वी ही जागा ग्रामपंचायतीला दिली आहे. त्यामुळे या पार्कची देखभाल करणे नेरळ ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे; परंतु याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या पार्कमध्ये सकाळ, संध्याकाळ बच्चे कंपनी व ज्येष्ठ नागरिक येत असतात. येथे बाकडे, घसरगुंडी, झोपाळा या साहित्यांची सोय करण्यात आली आहे; परंतु हे साहित्य आता मोडकळीस आले आहे, तसेच उद्यानाचे मुख्य गेट नेहमीच बंद असल्याने गेटवर अनेकांचे बॅनर झळकत असतात. आसन व्यवस्थेची कमतरता असल्याने अनेक ज्येष्ठ मंडळींना ताटकळत उभे राहावे लागते किंवा नाइलाजास्तव खाली बसावे लागत आहे. पार्कमधे नियमित साफसफाई करण्यात येत नसल्याने, पाला पाचोळा व कचरा जमा झाला आहे. पार्कला लागूनच गणपतीघाट असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथे येणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पार्कला संरक्षक जाळी बसविण्यात आलेली नाही. जवळच कर्जत-कल्याण मुख्य रस्ता असल्याने खेळताना मुले रस्त्यावर आली, तर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पार्कमधील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.