शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

फीवाढीविरोधात पालकांचे आंदोलन

By admin | Updated: February 24, 2016 03:12 IST

विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याच्या निषेधार्थ कोपरखैरणेतील क्राईस्ट अ‍ॅकॅडमी शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. विविध कारणे सांगून शाळेकडून वारंवार आर्थिक

नवी मुंबई : विश्वासात न घेता शुल्कवाढ केल्याच्या निषेधार्थ कोपरखैरणेतील क्राईस्ट अ‍ॅकॅडमी शाळेवर पालकांनी मोर्चा काढला होता. विविध कारणे सांगून शाळेकडून वारंवार आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप यावेळी पालकांनी केला. तर पालक शिक्षक समितीच्या (पीटीए) मंजुरीने शुल्कवाढ केल्याचे सांगत शाळा व्यवस्थापनाने आंदोलक पालकांना धुडकारून लावले.कोपरखैरणे येथील क्राईस्ट अ‍ॅकॅडमीने विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्कामध्ये यंदाच्या वर्षीपासून वाढ केली आहे. स्टेट बोर्डासाठी २३ टक्के तर आयसीसी बोर्डासाठी २६ टक्के अशी ही शुल्कवाढ आहे. मात्र ही शुल्कवाढ झाल्याचे पत्र पालकांच्या हाती मिळताच त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. मंगळवारी सकाळी सुमारे दीडशे पालकांनी शाळेला घेराव घातला. शाळा व्यवस्थापनाकडून सतत विविध कारणे सांगून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप उपस्थित पालकांनी केला. यापूर्वी शाळा इमारत दुरुस्ती निधीच्या नावाखाली १ ते ३ वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरणा करण्याचे पालकांना सूचित करण्यात आले होते. शाळेत शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे सर्वसामान्य घरातील, रिक्षा चालक व अल्प उत्पन्न घटकातील आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या पालकांना वगळता इतरांनी एकाच वेळी दीड ते दोन लाख रुपये शुल्क स्वरूपात शाळेत जमा केलेले आहे. त्यामुळे इतर पालकांवर फीवाढीचे ओझे लादले जात असल्याचाही आरोप पालक शेखर पाटील यांनी केला आहे. शाळेच्या कार्यक्रमांसाठी देखील पालकांकडून ३ ते ५ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. तसेच विद्यार्थी त्याच ठिकाणी शिकत असतानाही प्रत्येक तीन वर्षांनी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवून जादा १० हजार रुपये घेतले जातात. बहुतांश पालक चेकद्वारे विद्यार्थ्यांचे शुल्क शाळेत जमा करतात. मात्र शाळा व्यवस्थापनाच्या गलथानपणामुळे हे धनादेश तीन ते चार महिन्यांनी वटवण्यासाठी जमा होत असून त्यावर लागणारा दंड देखील पालकांकडून उकळला जात असल्याचा आरोप पालक सुनील पार्टे यांनी केला आहे. अखेर शाळा व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात पालकांनी ठिय्या मांडला. यावेळी शाळा व्यवस्थापनाने दोन पालकांना चर्चेसाठी बोलावून शुल्कवाढीचा निर्णय पीटीएच्या मान्यतेने झाल्याचे सांगितले. तसेच पीटीए कमिटीची स्वाक्षरी असलेले पत्रही दाखवले. यामुळे पीटीए कमिटी व पालकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)