शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलची शैक्षणिक परंपरा १६८ वर्षांची

By admin | Updated: March 18, 2016 00:24 IST

पनवेलला शेकडो वर्षांपासून व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरात १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली शाळा सुरू झाली. १८७३ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात

नवी मुंबई : पनवेलला शेकडो वर्षांपासून व्यापारी व शैक्षणिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरात १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली शाळा सुरू झाली. १८७३ मध्ये मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यापासून सुरक्षेसाठीही उपाययोजना केली होती. १६८ वर्षांपूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यामुळेच आज शहराला शैक्षणिक हबचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यात पुरोगामी दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक, सामाजिक विकास करणाऱ्या शहरांमध्ये पनवेलचा अग्रक्रमांक आहे. शहरातील मुलांना चांगले आधुनिक शिक्षण मिळावे याकडे लक्ष दिले होते. इंग्रजांनी १८३५ मध्ये भारतामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पनवेल नगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वीच येथील नागरिकांनी १ एप्रिल १८४८ मध्ये पहिली मराठी शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष पुढाकार घेतला होता. १८७१ मध्ये शाळा क्रमांक १ मध्ये ३२ विद्यार्थिनी असल्याची नोंद शिक्षण विभागाच्या दप्तरी आहे. त्यापूर्वी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली होती. शाळांमधील मुलींची संख्या वाढू लागल्यामुळे १८७३ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली. सुरवातीला सहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. सुरवातीला पुराणीकांच्या इमारतीमध्ये शाळा भरत होती. १९५४ मध्ये पी.एस. सी. च्या परीक्षेमध्ये या शाळेतील विद्यार्थिनी विजया गोविंद मराठे हिने ७४ टक्के गुण मिळवून विक्रम केला होता. मराठी माध्यमाच्या मुलांच्या व मुलींच्या शाळेबरोबर उर्दू व गुजराती माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या होत्या. स्वातंत्र्यापूर्वी १९४५ मध्ये शहरात पहिले महाविद्यालय सुरू झाले. शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाही येथील शिक्षण संस्थांनी सुरू केली होती. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी शहरातील शिक्षक सीताराम जनार्दन पटवर्धन यांनी पुअर बॉईज फंडची स्थापना केली. या योजनेअंतर्गत गरीब मुलांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जात होती. या योजनेची माहिती सर्वत्र व्हावी यासाठी १९५४ मध्ये केसरी, राष्ट्रतेज व इतर दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. तेव्हाही शहरातील ५०० ते ६०० विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची नोंद आहे. (प्रतिनिधी)मुुंबईसारख्या महानगरामध्ये आजही शाळांमध्ये प्रोजेक्टर व इतर अत्याधुनिक साधने नाहीत. राज्यातील व देशातील इतर शहरांचीही अशीच स्थिती आहे. परंतु पनवेलमधील कोकण एज्युकेशन संस्थेच्या शाळेमध्ये १९४४ ते १९४८ च्या दरम्यान सोळा मिलीमीटरचा प्रोजेक्टर (चलचित्र दाखविणारे यंत्र ) बसविण्यात आला होता. शाळेत बसविलेला हा पहिलाच प्रोजेक्टर असण्याची शक्यता आहे. तेव्हाच नगरपालिकेने शाळेमध्ये टेपरेकॉर्डर घेण्यासाठीही अनुदान दिले होते. विद्यार्थिनींची सुरक्षा पनवेलमधील शाळा क्रमांक १ मध्ये १८७१ मध्ये मुलींची संख्या ३२ होती. पनवेल व्यापारी पेठ असल्याने श्रीमंत मुली दागिने घालून शाळेत यायच्या. मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी तेव्हाच्या व्यवस्थापनाने घेतली होती. मुलींना शाळेत आणणे व नेण्यासाठी पाच रुपये पगाराने शिपायाची व्यवस्थाही केली होती. देशप्रेमी शिक्षक व गुणवंत विद्यार्थी गोवा मुक्ती संग्रामात शहीद हिरवे गुरुजी हे येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक होते. १९४८ मध्ये पी. डी. अत्रे या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठात ९ वा क्रमांक मिळविला. १९५४ मध्ये विजया मराठेने ७४ टक्के गुण मिळवले.