शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

पनवेल, उरणमधील पारंपरिक मासेमारी संकटात

By admin | Updated: February 6, 2017 04:46 IST

जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असली तरी नवी मुंबई, पनवेल, उरण भागात पिढ्यान्पिढ्या

उरण : जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असली तरी नवी मुंबई, पनवेल, उरण भागात पिढ्यान्पिढ्या पारंपरिक साधनांचा वापर करून अद्यापही समुद्र किनारपट्टी, खाड्यांमध्ये हजारो मच्छीमार पूर्वापार पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र ठिकठिकाणी समुद्रात होत असलेला माती दगडांचा भराव, किनारपट्टी आणि खाड्या कंपन्यांच्या रसायनमिश्रित सांडपाण्याने प्रदूषित झाल्या आहेत. यामुळे मासळी मिळणे कठीण झाल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आला आहे.नवी मुंबई परिसरासह उरण, पनवेल तालुक्यात सुमारे सहा बाजार मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये उरण, पनवेल तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, शेवा, न्हावा, गव्हाण, बेलपाडा, मुळेखंड, करंजा, मोरा, दिघोडे, खोपटा, केगाव-दांडा, घारापुरी आदि गावातील हजारो मच्छिमार कुटुंबियांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त अरबी समुद्राच्या खाडी किनाऱ्यावर अनेक गावे वसलेली आहेत. विस्तीर्ण पसरलेल्या खाड्या, विपुल खाजण जमीन, खाडी किनाऱ्यावर पसरलेली तिवरांची जंगले, मड प्लॉट, प्रवाळाने भरलेले खडक, वाळुकामय गुहा, खडकातीली खाचखळगे म्हणजे मत्स्यसंवर्धन मत्स्योत्पादन आणि माशांच्या प्रजोत्पादनासाठी सुरक्षित नैसर्गिक क्षेत्रच होय. सर्वच मोसमात विविध जातीचे रुचकर मासे विपुल प्रमाणात मिळत असल्याने पूर्वापार पारंपारिक मासेमारी व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. समुद्र खाड्यांमध्ये मच्छिमार आकडी, बगळी, भाला, आसू, झोळणे, पाग, वावरी, विळा, गळ, वाणे, खांदा, जाळी, डोल, फग अशा विविध पारंपरिक साधनांचा वापर अधिक करतात. या पारंपारिक साधनांचा उपयोग करीत यांत्रिक, बिगर यांत्रिक होड्यांच्या आधारावर मासेमारी व्यवसाय करीत असतात. अशा मासेमारीतून निवटे, शिंपल्या, चिंबोरी, किळशी, जिताडा, चिवणाी, बोईट, पालक, बाकस, ढोमा, कोळंबी, शिंगाला, हेकरू, वाकटी, मांदेली, शेवंड, तांब, पाला, पापलेट, बोंबील, बांगडा, घोल, रावस, कोळीम, खुबे, करपाली, भिलजी, करकरा, खडक खरबी, पाखट, शिवडा, मुशी, घोये, पोचे, इचार अशा विविध प्रकारची मासळी पकडून उदरनिर्वाह करीत.मासळीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छिमारांवर मागील काही वर्षापासून उपासमारीचे संकट येऊन ठाकले आहे. अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या पारंपारिक मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सातत्याने मच्छिमारांकडून केली जात आहे. त्यासाठी निदर्शने, मोर्चे, आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र मच्छिमारांच्या मागणीकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जात असल्याचा मच्छिमारांचा आरोप आहे. भरावामुळे बुजली जाणारी मासळीची आश्रयस्थाने, वाढत्या सागरी प्रदूषणामुळे मासळीचा जाणवणारा दुष्काळ यामुळे नवी मुंबई परिसरातील पारंपारिक मच्छीमार पुरता संकटात सापडला आहे. (वार्ताहर)