शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये डुकरांचा वावर कायम

By admin | Updated: August 25, 2015 00:53 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूची साथ फोफावत आहे. शहरामध्ये या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण आढळले असून डुकरांपासून स्वाइन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूची लागण होते.

पनवेल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूची साथ फोफावत आहे. शहरामध्ये या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण आढळले असून डुकरांपासून स्वाइन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूची लागण होते. पनवेल शहरामध्ये डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित डक्ुकर मालकांना १४ आॅगस्टला नोटिसा पाठवून ४८ तासात डुकरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिले होते. मात्र ४८ तास उलटूनही शहरात डुकरांचा वावर कायम असल्याने शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरामधील डुकर पालनाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र पालिकेच्या या नोटिसांना केराची टोपली दाखविली असल्याचीच परिस्थिती शहरात पहावयास मिळत आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या २६ असून ९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या पनवेल शहरातील रुग्णांची आहे. पनवेलमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८ आहे. तर संशयित रुग्णांची संख्या १५ आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने सतर्क होवून त्वरित डुकरांचे पालन करणाऱ्या शहरामधील १२ व्यावसायिकांना नोटिसा पाठवून डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. शहरात डुकरांची संख्या शंभरच्यावर आहे. यापैकी काही डुकरांची संख्या कमी झाली मात्र आजही शहरात डुकर सर्रास फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत स्वाइन फ्लूच्या साथीवर नियत्रंण ठेवण्यासाठी १३ जणांच्या विशेष पथकाची स्थापना केली आहे. नियमित फवारणी, जंतुनाशक फवारणी आदी जबाबदारी संबंधित पथकावर देण्यात आली आहे. शहरात जनजागृती म्हणून नगरपरिषदेच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांनी देखील पुढाकार घेतला आहे.पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉॅ. बी.एस.लोहारे यांनी स्वाइन फ्लूच्या लक्षणांची शंका आल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात अथवा ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. घशात खवखव, ताप येणे, डोकेदुखी, थकवा, खोकला आदी स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. (प्रतिनिधी)आमच्यामार्फत सतत यासंदर्भात पाठपुरावा सुरु आहे. काही डुक्कर व्यावसायिकांनी शहरातून डुकरांचा बंदोबस्त केला आहे. यासंदर्भात पुन्हा पाहणी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू.- डॉ. दिलीप कदम, आरोग्य अधिकारी, पनवेल नगरपरिषद