शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची होत आहे मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:15 IST

पनवेल महानगर पालिकेच्या कृष्णाळे तलावाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती.

पनवेल : पनवेल महानगर पालिकेत भालचंद्र धारप या अभियंत्याची तक्र ार ठेकेदारांनी थेट पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. निविदा मागविताना थेट स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप वास्तुशिल्प कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने केले आहे. यासंदर्भात लेखी पत्र आयुक्तांना दिले आहे.पनवेल महानगर पालिकेच्या कृष्णाळे तलावाभोवती स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र भालचंद्र धारप यांनी सर्व अटी शर्ती धाब्यावर बसवत स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप या कंत्राटदाराने केला आहे. विशेष म्हणजे आपल्या अधिकारातील तीन लाखपर्यंतची कामे स्वत:च्या मर्जीतील ठेकेदारांना दिली जात आहे. या कामाच्या माध्यमातून स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार सुरु आहे.यावर्षीच जून महिन्यात फडके नाट्यगृहात बॅरेकेटिंग बसविण्याचे काम भालचंद्र धारप यांनी काढले होते, परंतु या कामासाठी इतर कोणाच्याही निविदा धारप यांनी स्वीकारल्या नाहीत. अनेक वेळा सामोरे जावे लागत असून आयुक्तांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वास्तुशिल्प कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी केली आहे.माझे काम मी प्रामाणिकपणे करीत असतो. मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार काम करीत आहे. माझ्याविरोधात नेमकी काय तक्रार केली त्याबाबत मला अद्याप माहिती मिळाली नाही.- भालचंद्र धारप, अभियंता,पनवेल महानगर पालिका

टॅग्स :panvelपनवेल