शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरातील १२५ बार होणार बंद!

By admin | Updated: December 30, 2016 04:18 IST

महामार्गालगत होणाऱ्या अपघातांना नजीक असलेले हॉटेल्स, बार जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत

- वैभव गायकर,  पनवेलमहामार्गालगत होणाऱ्या अपघातांना नजीक असलेले हॉटेल्स, बार जबाबदार असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत असलेल्या सर्वच हॉटेल्स, बारला टाळे ठोकण्यात येणार आहे. या आदेशाने पनवेल, उरणमधील बार मालकांना मोठा फटका बसणार असून, जवळजवळ ८० टक्के म्हणजेच १२५ बार बंद होणार आहेत. याकरिता मोजमाप व नोटीस बजावणीचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग पनवेलने हाती घेतले आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यासंदर्भात सर्व प्रक्रि या सुरू करून सरकारकडे माहिती सादर करण्यात येणार आहे. पनवेल शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पुणे-मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या या शहरातील बारमध्ये अगदी पुण्यापासून ग्राहक येतात. पनवेलमध्ये एकूण १४० बार आहेत. त्यापैकी २९ हे लेडीज सर्व्हिस बार आहेत. या १४0 बारपैकी १२५ बार बंद होण्याच्या मार्गावर आहेत. १ एप्रिल २०१७ पासून हे बार कायमस्वरूपी बंद होतील. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह महामार्ग क्र मांक ४ वर हे बार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बार हॉटेल्स ना नोटीस बजावण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात मोजमाप सुरू असून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पनवेल येथील अधिकारी सुधीर पोकळे यांनी दिली. पनवेलमधील कोन गाव व कोळखे परिसरात असलेले बहुतांश बार बंद झाल्यानंतर बारसाठी कुप्रसिध्द असलेल्या पनवेलची ओळख काही प्रमाणात पुसली जाईल. मात्र यामुळे सरकारचा जवळजवळ ४२ कोटींचा महसूल बुडणार आहे. हे बार बंद झाल्यास याठिकाणी काम करणाऱ्या पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रि या आम्ही सुरू केली आहे. महामार्गालगत ५०० मीटरपर्यंत येणाऱ्या बारमालकांना प्राथमिक माहिती स्वरूपात नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात मोजमाप प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रि या संपेल, त्यानंतर सरकारला अहवाल पाठविला जाईल. - सुधीर पोकळे, अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल