शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पनवेलमध्ये सम विषम पार्किंगची ऐशीतैशी

By admin | Updated: September 2, 2016 03:54 IST

तालुक्याचे ठिकाण असल्याने पनवेल शहरात अनेक सरकारी कार्यालये, न्यायालय, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, सराफा बाजार, आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत.

- वैभव गायकर, पनवेलतालुक्याचे ठिकाण असल्याने पनवेल शहरात अनेक सरकारी कार्यालये, न्यायालय, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, सराफा बाजार, आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. मुख्य बाजारपेठ असल्याने गणेशोत्सवानिमित्त खरेदी करणाऱ्यांचीही शहरात गर्दी होत आहे. वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरात सम-विषम पार्किंगचा नियम लागू असला तरी चालकांकडून नियमाची पायमल्ली होत आहे. नेमक्या कोणत्या ठिकाणी कारवाई करावी, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून वाहतूक नियंत्रित करताना त्यांची तारांबळ उडत आहे. अपुरे मनुष्यबळ व चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी जॅमर बसविण्यात आले आहेत. मात्र वाहनांच्या संख्येत त्यांची संख्या मोजकीच असल्याने वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत. काँक्रीटीकरणामुळे काही रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अनधिकृत पार्र्किंग करण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता कमी पडत आहे. शहरातील बहुतांश जुन्या इमारतीमध्ये पार्र्किंगची सुविधा नसल्याने ही वाहनेही रस्त्यावरच दुतर्फा उभी केली जातात. शिवाजी पुतळा ते रु पाली टॉकीज या सुमारे १ किमीपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे चालकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. कर्नाळा सर्कल, विरुपाक्ष मंदिर, महात्मा फुले रस्ता, बाजारपेठ याठिकाणीही कोंडी होत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. सध्या केवळ ७ जॅमर उपलब्ध आहेत. वाहनांच्या संख्येत हा आकडा कमी आहे. पनवेल नगरपरिषदेकडे ५० जॅमरची मागणी केली आहे, मात्र अद्याप ते मिळालेले नाहीत.