शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी बाहेरचे ‘पोलीस’बळ

By admin | Updated: September 1, 2016 03:19 IST

कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महामार्ग पोलिसांनी इतर परिक्षेत्रातून अतिरिक्त कुमक मागवली आहे.

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीकोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता महामार्ग पोलिसांनी इतर परिक्षेत्रातून अतिरिक्त कुमक मागवली आहे. गुरुवारपासून बंदोबस्ताला सुरुवात होणार असून कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी बुधवारी रवाना झाले आहेत. वाहतूक कोंडी, अपघात होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली असल्याचे महामार्ग पोलिसांच्या पळस्पे केंद्रातून सांगण्यात आले.गणेशोत्सव हा कोकणातील प्रमुख सण मानला जातो. यानिमित्ताने पाच ते सहा लाख कोकणवासीय आपल्या मूळ गावी जातात. नोकरी- व्यवसायानिमित्त मूळचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील असलेले पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई शहर आणि उपनगरात स्थायिक झालेले आहेत. यापैकी बहुतांशी जण आपल्या कोकणातील घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. रेल्वेबरोबरच एसटी आणि खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात जातात. गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा याकरिता प्रशासन विशेष खबरदारी घेते. त्याचबरोबर गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोकणवासीय वेळेत पोहचावे याकरिता वाहतूक विभाग दक्ष असतो. मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत महामार्ग पोलिसांची हद्द येते. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस गोवा महामार्गावर लाखो वाहने कोकणाकडे जातात. त्यावेळी वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांवर असते. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही बाहेरच्या परिक्षेत्रातून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. पुणे, नागपूर, नाशिक परिक्षेत्रातून महामार्ग पोलिसांची कुमक मुंबई-गोवा महामार्गावर मागविण्यात आली आहे. मंगळवार आणि बुधवारी पळस्पे केंद्रावर बाहेरचे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. त्यांना बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांना बंदोबस्ताबाबत प्राथमिक प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले. त्याचबरोबर खाजगी क्रे न आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली आहे. १ ते १६ सप्टेंबरपर्यंत हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परतीचा प्रवास सुध्दा सुखकर व्हावा याकरिता पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. (वार्ताहर)