शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’मुळे प्रशासन दक्ष !

By admin | Updated: January 19, 2016 02:13 IST

नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी २६ जानेवारीपासून ‘आपले सरकार’ हे पोटर्ल सर्वसामांन्यासाठी सुरू होणार आहे.

अलिबाग : नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी २६ जानेवारीपासून ‘आपले सरकार’ हे पोटर्ल सर्वसामांन्यासाठी सुरू होणार आहे. सेवा हमी कायदा, तक्रार निवारण, माहितीचा अधिकार आणि सहयोग या सेवांचा या पोर्टलमध्ये समावेश आहे. संगणकाच्या बरोबरीनेच मोबाइलवरही सेवा मिळणार आहे. या सेवेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता दक्ष राहून काम करावे लागणार आहे.राज्य सरकार ई-गव्हर्नर अंगीकारले आहे. त्यामुळे पेपरलेस कामे करण्यावर भर देण्यात येत असून, पैशाची आणि वेळेचीही बचत होणार आहे. ‘आपले सरकार’ या पोर्टलमुळे सरकार आणि नागरिक हे एकमेकांच्या जवळ येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जदाराच्या अर्जाचा प्रवास कसा आणि सध्या कोणत्या टेबलावर आहे, याची माहितीही या पोर्टलमुळे प्राप्त होणार आहे. अर्जाचा मागोवा घेत असताना याद्वारे जलद सेवा मिळणार आहे.वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, मिळकितीचे प्रमाणपत्र, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पत दाखला अशा महसूल विभागाशी संलग्न असलेल्या सेवा, त्याचप्रमाणे ग्रामविकास व पंचायराज, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संलग्न असणाऱ्या सेवा संगणकाच्या एका क्लिकवर प्राप्त होणार आहेत. कोणत्या अधिकाऱ्याने अर्जदाराच्या फाइलचा निपटारा किती दिवसांत करणे अपेक्षित आहे, याची माहितीही या पोर्टलवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जरी आॅनलाइन माहिती उपलब्ध झाली नाही, तरी अर्जदार संबंधित अधिकाऱ्याला याचा जाब विचारू शकतो. त्यामुळे विहित वेळेमध्ये कामाचा निपटारा करण्यास संबंधित अधिकारी बांधील आहे. (प्रतिनिधी)