शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस घरवाटपासाठी संघटनेचे पत्र

By admin | Updated: August 29, 2016 05:18 IST

माथाडी कामगारांसाठी मंजूर केलेली घरे बिगर माथाडींना मिळवून देण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. आतापर्यंत १०४ जणांचे साडेचार कोटी रूपये हडप केल्याचे समोर आहे

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईमाथाडी कामगारांसाठी मंजूर केलेली घरे बिगर माथाडींना मिळवून देण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. आतापर्यंत १०४ जणांचे साडेचार कोटी रूपये हडप केल्याचे समोर आहे. घरे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या शिफारसपत्राचाही वापर केला असल्याने या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. शासनाने १९९५ मध्ये माथाडी कामगारांना नवी मुंबईमध्ये तीन हजार घरे मंजूर केली होती. यामधील दीड हजार घरे मुंबई भाजीपाला फळे कामगार संघटनेच्या सदस्यांना देण्यात आली होती. कामगारांच्या बोगस संस्थेला घरे वाटप केल्याचे निदर्शनास येताच माथाडी नेते शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी आवाज उठविला होता. २००८ मध्ये एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करून घर वाटप रद्द केले होते. यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये ही घरे कामगारांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु याच दरम्यान युनियनमधील कर्मचारी दिलीप ऊर्फ भाऊसाहेब यादव याने बिगर माथाडींना घरे मिळवून देण्याचे आमिष दाखविले व त्यासाठी प्रत्येकाकडून २ ते १० लाख रूपये वसूल केले होते. परंतु पैसे घेवूनही घरे न मिळाल्यामुळे १०४ जणांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये यादव व संतोष चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आतापर्यंत साडेचार कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. ज्या माथाडी संघटनेने बोगस संस्थेला घरे वाटप केल्याचे उघडकीस आणले होते त्याच संघटनेमधील कर्मचाऱ्याने नेत्यांच्या नावाचा वापर करून बिगर माथाडींची फसवणूक केली असल्याचे समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले आहे. माथाडींची घरे बिगर माथाडींना देण्यामध्ये कोणाही एका व्यक्तीचा समावेश असूच शकत नाही. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींनी नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून घरे हवी असलेल्यांचा विश्वास संपादन केला. तुमची माथाडी बोर्डात कामगार म्हणून रीतसर नोंदणी केली जाईल. त्याविषयी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच घरे देण्यात येतील. नेत्यांच्या कोट्यातून ही घरे दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे यामध्ये संघटनेमधील कोणी सहभागी आहे का याविषयी तर्क वितर्क सुरू झाले आहेत. सिडकोकडे घरे मिळविण्यासाठी माथाडी संघटनेच्यावतीने पत्रव्यवहार केला आहे. माथाडी संघटनेचा पत्रव्यवहार हा सरचिटणीसाच्या नावाने केला जातो. फसवणूक करणाऱ्यांची शिफारसही माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची सही असलेल्या पत्राद्वारेच झाल्याचे निदर्शनास आले आहे. संघटनेच्या पत्राचा दुरूपयोग झाला असल्याने या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे बोलले जात असून त्याचा सखोल तपास होण्याची मागणी होत आहे.