शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दल उघड्यावर

By admin | Updated: February 24, 2016 03:12 IST

आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम

नवी मुंबई : आपत्काळात नागरिकांच्या मदतीला धावणारे वाशीचे अग्निशमन दलच उघड्यावर पडले आहे. जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्याठिकाणी नवी इमारत उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान अग्निशमन दलाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांची पर्यायी ठोस व्यवस्था होणे गरजेचे असतानाही केलेल्या पर्यायी सोयीमुळे कर्मचाऱ्यांची असुविधा होत आहे.महापालिका क्षेत्रात लागलेली आग विझवण्यास अनेक आपत्ती प्रसंगी अग्निशमन दलाने केलेले कार्य मोलाचे ठरत आहे. औद्योगिक क्षेत्राचे देखील स्वतंत्र अग्निशमन दल असतानाही त्याठिकाणच्या दुर्घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका महापालिकेच्याच अग्निशमन दलाला घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या या महत्त्वाच्या अग्निशमन यंत्रणेचे वाशी येथे मुख्य केंद्र आहे. परंतु सध्या हेच अग्निशमन दलाचे केंद्र उघड्यावर पडले आहे. वाशी, ऐरोली व सीबीडी येथील अग्निशमन दलाच्या सिडकोकालीन इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहावे लागत होते. अखेर सीबीडीपाठोपाठ वाशीच्या जुन्या इमारतीचे पुनर्बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या इमारत बांधकामाला सुरवात झाली आहे. यामुळे त्याच जागेवर विरुध्द दिशेला अग्निशमन दलाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत कामगारांना नेरुळ किंवा इतर पर्यायी ठिकाणच्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. यामध्ये कार्यालय मात्र पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ज्याठिकाणी अग्निशमन दलाची वाहने उभी केली जात आहेत त्याठिकाणी सुरक्षा भिंतच नाही. यामुळे समोरच्या मार्गाने जाणारे कोणतेही वाहन थेट अग्निशमन दलाच्या जागेत प्रवेश करू शकते. याचाच गैरफायदा समाजकंटकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी सोय करतेवेळी त्याठिकाणची पूर्वीची भिंत पाडल्यानंतर पुन्हा ती बांधून फाटकही उभारलेले नाही. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाहनांच्या सुरक्षेसाठी वाहनांसमोर बसून रात्र जागवावी लागत आहे. अग्निशमन दलात कोट्यवधी रुपये किमतीची वाहने असून नुकतेच एक नवे रेस्क्यू आॅपरेशन वाहन देखील सेवेत दाखल झाले आहे. ही सर्व वाहने त्याच ठिकाणी उभी असतात. कर्मचाऱ्यांसाठी बनवलेल्या तात्पुरत्या कार्यालयात पिण्याच्या पाण्यापासून ते इतर अनेक गैरसोयी होत आहेत. परंतु न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.वाशी अग्निशमन दलासाठी नवी इमारत उभारण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे. या दरम्यान त्याच भूखंडाच्या मोकळ्या जागेत अग्निशमनची पर्यायी सोय केलेली आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी नेरुळ व इतर उपलब्ध जागेत सोय केली जाणार आहे. सात ते आठ महिन्यांत कामाच्या पहिल्या टप्प्यात एक इमारत पूर्ण करून त्यामध्ये कार्यालयाची सोय केली जाईल. परिस्थितीची पाहणी करून लवकरच सुरक्षा भिंतही बांधली जाईल.- मोहन डगावकर, शहर अभियंता.