शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून एकाची हत्या

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

किरकोळ वादातून एका सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मालकाला चुगली करत असल्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत

नवी मुंबई : किरकोळ वादातून एका सहकाऱ्याची हत्या करणाऱ्या दोघा सुरक्षारक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मालकाला चुगली करत असल्याच्या संशयावरून मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यात वाद सुरू होता. या प्रकारात जबर मारहाण झाल्याने एकाचा मृत्यू झाला.सोमवारी मध्यरात्री वाशीतील महात्मा गांधी कॉम्प्लेक्सलगत हा प्रकार घडला. तिघांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बिट मार्शल शाबीर तडवी व अनिल पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अमोल समुद्रे हे जखमी अवस्थेत आढळले. परंतु पोलीस येण्याअगोदरच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. काही अंतरावरच प्रत्यक्षदर्शीअशोक कनोजिया उपस्थित होते. त्यांनी मारेकरी पळालेल्या दिशेची माहिती देताच, बिट मार्शल पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. दरम्यान, उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी जखमी अमोल समुद्रे यांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार समुद्रे यांच्या हत्येप्रकरणी विजय गायकवाड व विकास बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. समुद्रे व त्यांचे मारेकरी हे तिघेही बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानीच्या बंगल्याचे सुरक्षारक्षक आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्यात कामावर उशिरा येण्यावरून वाद सुरू होता. समुद्रे हे मालकाला चुगली करत असल्याचा संशय गायकवाड व बिरादार यांना होता. यावरून सोमवारी त्यांच्यात हाणामारी झाली.