शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून एकाचा खून

By admin | Updated: June 26, 2017 01:43 IST

वाहतुकीच्या किरकोळ वादातून एका वाहनधारकाने मध्यस्थी करणाऱ्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागीच ठार झाला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाहतुकीच्या किरकोळ वादातून एका वाहनधारकाने मध्यस्थी करणाऱ्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागीच ठार झाला. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. सलीम शमशाद खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी कोपरखैरणे येथून विनोद दरेकर (२३) आणि सुशांत जुनघरे (२७), दोघांना अटक केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप कांबळे हे उबेर कंपनीची व्हॅगनर गाडी घेऊन वाशी प्लाझा येथील उड्डाण पुलाजवळ प्रवासी घेण्यासाठी थांबले होते; परंतु ऐनवेळी त्यांचे भाडे रद्द झाल्याने चहा पिण्यासाठी त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या टपरीकडे आपली गाडी वळविली. त्याच वेळी वाशी स्थानकाकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या इर्टिगा गाडीच्या समोर ही गाडी आली. त्यामुळे इर्टिगा गाडीचा चालक विनोद दरेकर, त्याचा मित्र सुशांत नामदेव जुनघरे आणि कांबळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आरोपींनी दिलीप याला गाडीबाहेर खेचून मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून जवळच चहा पीत असलेल्या सलीम शमशाद खान (२९, रा. कल्याण) आणि मोहसीन सलीम मोमीन (वय २७, रा. घणसोली) यांनी मध्यस्थी केली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी कांबळे आणि मध्यस्थी करणाऱ्यांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या कांबळे यांनी मध्यस्थी करणाऱ्या दोन युवकांना टोलनाक्यापर्यंत सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार मध्यस्थी करणारे मोहसीन आणि सलीम हे दोघे आपल्या स्कुटीवरून कांबळे याच्या गाडीच्या मागे टोलनाक्याच्या दिशेने निघाले. वाशीगाव येथे आले असताना, मागावर असलेल्या इर्टिगा गाडीतील आरोपींनी स्कुटीला जोरदार धडक दिली. यात सलीम खान हा जागीच ठार झाला. तर मोहसीन मोमीन हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ठोकर लागल्याने आरोपीची इर्टिगा गाडी शेजारच्या दुभाजकावर आदळल्याने ती बंद पडली. त्यामुळे आरोपींनी गाडी तेथेच सोडून पळ काढला. या गुन्ह्याची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध माहितीच्या आधारे अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.