शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीत जुन्या वाहनांचा बाजार सुरूच

By admin | Updated: August 29, 2016 05:16 IST

महापालिकेने पदपथांवरील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. परंतु या कारवाईला न जुमानता अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळते.

नवी मुंबई : महापालिकेने पदपथांवरील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. परंतु या कारवाईला न जुमानता अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे पाहावयास मिळते. जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी तर महापालिकेच्या या कारवाईला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. विशेषत: कोपरी येथील कार बाजार पुन्हा पाय रोवताना दिसत आहे.पामबीच मार्गावरील कोपरी सिग्नलजवळील जुन्या वाहनांचा बाजार मागील काही दिवसांपासून पुन्हा तेजीत आला आहे. विक्रीसाठी आलेली वाहने सर्रासपणे पदपथांवर पार्क केली जातात. विशेष म्हणजे या कार बाजारविषयी वाहनधारक व स्थानिक रहिवाशांच्या नेहमीच्या तक्रारी आहेत. त्यानुसार येथील व्यावसायिकांवर यापूर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर पदपथांवरील वाहनांचे अतिक्रमण रोखण्यासाठी ठिकठिकाणी लोखंडी रॉड लावण्यात आले होते. मात्र हे लोखंडी रॉडही गायब झाल्याचे दिसून आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार अनेक भागातील जुन्या विक्रीच्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परंतु कारवाईचा ज्वर ओसरताच या विक्रेत्यांनी पुन्हा आपले व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येते. कोपरीप्रमाणेच कोपरखैरणे व वाशी परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यांवरही जुन्या वाहनांचा विक्री बाजार थाटल्याचे पाहावयास मिळते. घणसोली स्थानकासमोरील रस्त्याच्या पदपथांवर दुचाकी विक्रीचे शोरूम आहे. या शोरूम्सधारकांनी विक्रीसाठी आलेल्या नवीन दुचाकी चक्क पदपथांवर उभ्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना येथून ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे.(प्रतिनिधी)