शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
2
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
3
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
5
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
6
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
7
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
8
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
9
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
10
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
11
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
12
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
13
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
14
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
15
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
16
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
17
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
18
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
19
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!

पनवेल पालिकेच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:58 IST

राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल नगरपालिकेचा कारभार अद्याप हायटेक झालेला नाही. नगरपालिकेच्या संकेतस्थळावर सभापतींची चुकीची नावे देण्यात आली आहे

नवी मुंबई : राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेल नगरपालिकेचा कारभार अद्याप हायटेक झालेला नाही. नगरपालिकेच्या संकेतस्थळावर सभापतींची चुकीची नावे देण्यात आली आहेत. शहर व मनपाविषयी अपुरी माहिती असल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. पनवेल नगरपालिकेची स्थापना १ सप्टेंबर १८५२ ला झाली. पालिकेला जवळपास १६४ वर्षे झाल्यानंतरही येथील कारभार अद्याप काळानुसार बदलला नाही. भविष्यात हे शहर देशातील सर्वात प्रमुख शहर असणार आहे. विमानतळ, नैना, बाजूला असणारे जेएनपीटी यामुळे राज्यातील सर्वात जास्त गुंतवणूक येथे होत आहे. पनवेल महानगरपालिका करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. राज्यातील अ वर्ग दर्जाच्या या पालिकेचे संकेतस्थळ मात्र अद्याप सुधारलेले नाही. जगभरातील नागरिकांना पालिकेच्या कामांची व येथील पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह विकास कामांची माहिती व्हावी म्हणून संकेतस्थळ तयार केले आहे. परंतु पदाधिकारी बदलल्यानंतर तेथील माहिती बदलली जात नाही. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सीता पाटील असताना संकेतस्थळावर अद्याप संगीता कांडपाळ यांच्याच नावाचा उल्लेख आहे. नियोजन व विकास समिती, शिक्षण व क्रीडा, आरोग्य. पाणीपुरवठा व जलनिस्सारणसह बांधकाम समिती सभापतींचीही चुकीची नावे देण्यात आली आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर आॅन गोर्इंग प्रोजेक्ट, फॅक्ट शिट, लोकोपयोगी सेवा, पर्यटन, क्षेत्र आणि प्रभाग याविषयी माहितीचे हेड तयार केले आहेत. परंतु यामध्ये कोणतीच माहिती दिलेली नाही. नगरपालिकेविषयी अत्यंत त्रोटक माहिती दिली असल्यामुळे शहराची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी संकेतस्थळाला भेट देणाऱ्या नागरिकांची निराशा होत आहे. याशिवाय शहराविषयी चुकीची माहिती जात आहे. माहितीचा अधिकार या शीर्षकाखाली नगरपालिकेच्या सभासदांची दिलेली माहितीही चुकीची आहे. गतवर्षीच्या सभापतींचीच नावे याठिकाणी आहे. प्रशासन संकेतस्थळावरील माहितीमध्ये कधी सुधारणा करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)