शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बजेटमधील घरांच्या मार्गात अडथळे

By admin | Updated: March 9, 2016 04:20 IST

केंद्र शासनाने आगामी अर्थसंकल्पात बजेटमधील घरांना विशेष प्रोत्साहन दिले आहे. विकासकांनी मोठ्या प्रमाणात बजेटमधील घरांची निर्मिती करावी, यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत.

कमलाकर कांबळे, नवी मुंबई केंद्र शासनाने आगामी अर्थसंकल्पात बजेटमधील घरांना विशेष प्रोत्साहन दिले आहे. विकासकांनी मोठ्या प्रमाणात बजेटमधील घरांची निर्मिती करावी, यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु बांधकाम परवानग्यांसाठी विकासकांना करावी लागणारी कसरत, जमिनींची उपलब्धता आणि इतर क्लिष्ट अटी व नियमांमुळे बजेटमधील घरे ही संकल्पना कागदावरच सीमित राहण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. केंद्र सरकारने २0२२ पर्यंत प्रत्येकाला घरे देण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने २0१६-१७ च्या अर्थसंकल्पात बजेटमधील घरे निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे. छोट्या घरांच्या निर्मितीला गती मिळावी, यासाठी विकासकांना करात सूट देवून गोंजारण्यात आले आहे.चार महत्त्वाच्या शहरात ३0 चौरस मीटर क्षेत्रफळांच्या घरांची निर्मिती करणाऱ्या विकासकांना शंभर टक्के कर माफ करण्यात आला आहे. तसेच अन्य शहरात ही योजना ६0 चौरस मीटर क्षेत्रफळांच्या घरांसाठी लागू होणार आहे. विकासकांबरोबरच ग्राहकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असे असले तरी जोपर्यंत विकासकांना भेडसावणाऱ्या मूळ प्रश्नांची सोडवणूक होत नाही, तोपर्यंत बजेटमधील घरांची संकल्पना अस्तित्वात येणे शक्य नसल्याचा मतप्रवाह या निमित्ताने तयार झाला आहे. विशेष म्हणजे बजेटमधील घर निर्मितीसाठी तीन वर्षांची कालमर्यादा देण्यात आली आहे. जून २0१६ ते मार्च २0१९ या कालावधीत परवानग्या घेवून पूर्ण होणाऱ्या गृहप्रकल्पांनाच या करमाफीचा फायदा होणार आहे. वास्तविकपणे बांधकाम व इतर आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या आकारानुसार दोन ते चार वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे बजेटमधील घरांच्या निर्मितीसाठी निर्धारित केलेली तीन वर्षांची मुदत सर्वसामान्यांना घरे या संकल्पनेला छेद देणारी असल्याचे मत एमसीएचआय-क्रेडाईच्या नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या तीन वर्षांच्या निर्धारित वेळेत केवळ १00 घरांपर्यंतचे प्रकल्पच पूर्ण करता येणे शक्य असल्याने बजेटमधील मास हाऊसिंग योजना केवळ कागदावरच सीमित राहण्याची शक्यता असल्याचे बाविस्कर यांनी स्पष्ट केले आहे.