शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत नवे वसतिगृह नाही, विद्यार्थ्यांची परवड

By admin | Updated: August 29, 2016 04:37 IST

एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी प्रचंड वाढ आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत एकही नवीन वसतीगृह उघडले न

शौकत शेख,  डहाणूएकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी प्रचंड वाढ आणि दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत एकही नवीन वसतीगृह उघडले न जाणे व अस्तित्वातील वसतीगृहे आणि आश्रमशाळा यांच्या इमारती मोडकळीस येणे. तुटपुंज्या दरामुळे भाड्याने इमारती न मिळणे यामुळे आदीवासी विद्यार्थ्यांची सध्या प्रचंड परवड होते आहे. विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अपुऱ्या आश्रमशाळा, तसेच निवासी वसतीगृहामुळे दरवर्षी हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापसून वंचित राहण्याची वेळ येत असून यावर्षी देखिल डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथे एकही नवीन वस्तीगृह नवीन इमारत, किं वा विद्यमान वसतीगृहातील क्षमता वाढविली नसल्याचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढते आहे तर वस्तीगृहे आणि आश्रमशाळा यांच्या क्षमतेत मात्र वाढ होत नाही. जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वसतीगृहाची संख्या व क्षमता तातडीने वाढवावी अशी मागणी विविध आदिवासी संघटनांकडून होते आहे.शासनाने डहाणू, तलासरी, पालघर, वसई सारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात १७ निवासी वस्तीगृहे तसेच ३५ आश्रमशाळा याबरोबरच अनुदानित शाळा सुरू केल्या. त्यात सुमारे १६ हजार आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी निवासी शिक्षण घेत असतात. त्यांना दररोज नाश्ता, दूध, फळांबरोबरच दोन वेळच्या भोजनाची देखिल शासनाने व्यवस्था केली आहे. शिवाय शहरीभागात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर अनुदान, शिष्यवृत्ती तसेच इतर खर्च दिला जात असल्याने ते मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळू लागल्याने डहाणू, पलघर, तलासरी, वसई सारख्या ठिकाणच्या वस्तीगृह तसेच आश्रमशाळा कमी पडू लागल्या आहेत. दरम्यान पालघर जिल्हयातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावात गेल्या दहा वर्षात उत्तीर्ण होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या वर गेली आहे. मात्र शासन तसेच प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे आश्रमशाळा तसेच वसतीगृहाची संख्या जैसे थे असल्याने तालूक्याच्या ठिकाणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही, परिणामी दर वर्षी हाजारो गोर-गरीब विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या कुटुंबियासोब रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात. एकीकडे आदीवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करायचे आणि त्याचवेळी त्यांना प्राथमिक व माध्यमिक क्षणापासून वंचितही ठेवायचे असा दुतोंडी कारभार सध्या आदिवासी विकासखाते करते आहे.