शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चारा नाही, पाणी नाही, दापचरी सुरु होणार कसा?

By admin | Updated: August 19, 2015 23:32 IST

पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे

तलासरी : पुरेसा पाऊस नाही, सिंचनासाठीचे वॉटरपंप जळालेले ते दुरुस्त करण्यासाठी निधीचा अभाव अशा कात्रीत दापचरी येथील शेतकरी अडकला असून त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाला आहे. येथील शासकीय प्रकल्प भ्रष्टाचारामुळे बंद पडलेला आहे. दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी येथील शेतकऱ्यांना कसरत करवी लागते आहे. जनावरांनासाठी लागणारा चारा पिकविण्यासाठी सिंचन सुविधा नाही, पाऊस पडत नाही त्यामुळे व्यवसाय करायचा कसा, हा प्रश्न आहे. एका बाजूला दूध उत्पादन करा, चारा पिकवा, याचा तगादा तर दुसऱ्या बाजूला चारा उत्पादनासाठी व जनावरांसाठी पाण्याचा पुरवठाच नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना (कृषी क्षेत्रधारकांना) प्रवाह व उपजल सिंचनाद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या उपजल सिंचन क्र. ४, ५ व १५८ वरील शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तसेच उपजल सिंचन क्र. ५ वरील चारी क्र. २८ वरून होणारा पाणीपुरवठा गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. तर उपजलसा सिंचन क्र. ४ धामणीनाला येथील विद्युत मोटारी जळाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कृषी सिंचन बंद आहे. उपजलसा क्र. ५ वर तीन मोटारी (विद्युत) असून त्यापैकी एकच मोटार गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. परंतु, तीही विद्युत मोटार जून २०१५ पासून बंद पडल्याने दापचरेतील कृषी क्षेत्राचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद पडला आहे. त्यामुळे पावसाळा असूनसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्यापासून बंद पडलेल्या मोटारीची बेअरिंग जळाली आहे. परंतु, दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या विद्युत विभागाकडे बेअरिंग टाकून मोटार दुरुस्त करण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. प्रकल्प बंद पडल्यापासून दापचरी प्रकल्पाच्या विद्युत विभागाला फारसे कामही नाही, तरीही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च होतात. परंतु, बेअरिंगसाठी नाममात्र रक्कम खर्च करावयास असू नये, यासारखे दुर्दैव तरी कोणते. (वार्ताहर)