शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीचे मोबाइल अ‍ॅप

By admin | Updated: March 4, 2016 01:59 IST

विविध कारणांमुळे घसरलेली एनएमएमटीची प्रवासी सेवा आता रुळावर येताना दिसत आहे. मागील दीड दोन वर्षात उपक्रमात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत.

नवी मुंबई : विविध कारणांमुळे घसरलेली एनएमएमटीची प्रवासी सेवा आता रुळावर येताना दिसत आहे. मागील दीड दोन वर्षात उपक्रमात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून उपक्रमाने आता मोबाइल अ‍ॅप तयार केला आहे. याद्वारे प्रवाशांना तिकीट आणि पासेस आॅनलाइन घेता येणार आहेत. सध्या ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.एनएमएमटी-आरटी हे या अ‍ॅपचे नाव आहे. हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या सहाय्याने प्रवास सुरू होण्याआधीच एक किंवा अनेक तिकिटे आणि पास काढण्यास मदत होणार आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पेमेण्ट गेटवेही उपलब्ध करून देण्यात आल्याने तत्काळ पेमेण्ट करणेही शक्य होणार आहे.या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पास काढण्याची प्रक्रि या पूर्णपणे डिजिटल असल्याचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थी आणि मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. पासकरिता लागणारे सर्व दस्तावेज अतिशय सहजपणे अपलोड करता येणार असून त्यांची पडताळणी देखील एनएमएमटीच्या अधिकाऱ्यांमार्फत आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे कागदोपत्री व्यवहार करावे लागणार नाहीत. या अ‍ॅपच्या दाखलीकरणाबद्दल बोलताना एआॅन सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीने हा मोबाइल अ‍ॅप तयार केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना जोसेफ यांनी अलीकडेच या अ‍ॅपसंदर्भात अधिकारी वर्गाला माहिती दिली. (प्रतिनिधी)